शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:55 IST

'राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे.

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज म्हणाले होते की, 'उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या कामाचे नाहीत.' त्यावर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

'तुमच्यामुळेही शिवसेना फुटली'मीडियाशी संवाद साधताना खैरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे राज यांचे मोठे भाऊ आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्याबद्दल अशी टीका करणे योग्य नाही. मी आता राज ठाकरेंना हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असे काही बोलू नका. शिवसेना जेव्हा फुटली होती, तेव्हा राज ठाकरे हेदेखील त्याला कारणीभूत होते. त्यावेळी ते औरंगाबादेत आले असतांना त्यांचा मलाही फोन आला होता. तेव्हा त्यांनी मला मी तुम्हाला माझ्याकडे बोलवतं नाही, पण माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रोखू नका, असे सांगतिले होते.'

'राजकारणात पुत्रप्रेम असतेच''आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही पाहिले आहे, उद्धव ठाकरेंनी आणि तुम्ही पक्षासाठी किती काम केले आहे. आपण ठाकरे आहात आणि लोक ठाकरे परिवाराला मानतात. पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आता ज्या एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यांच्या मुलालादेखील शिवसेनेने खासदारकी दिली होती. तरीदेखील त्यांनी शिवसेनेशी गद्दीर केली,' असंही खैरे म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे बोलतात वेगळं आणि आणि करतात वेगळं, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखे काही नाही. उद्धव यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला जेवढी माहिती नाही तेवढ्य़ा जवळून मला माहिती आहे. शिवसेना फुटण्याचे कारण पुत्रप्रेम होते, बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली,' असं राज म्हणाले होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबाद