शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवैध ठिकाणी दारु पिऊ नका;'यारा दा ढाब्या'वर एक्साईजचा छापा, मालकासह सातजण पकडले

By राम शिनगारे | Updated: September 15, 2022 18:10 IST

शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही ढाबे, हॉटेलवर अवैधपणे दारु पिताना आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.

औरंगाबाद : परवानगी नसलेल्या हॉटेल. ढाब्यांवर दारु पिण्यास कायद्याने बंदी आहे. बीड बायपास रोडवरील गांधेली फाटा येथील 'यारा दा ढाबा' येथे सात जणांना दारु पिणे चांगलेच महागात पडले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ढाब्यावर छापा मारीत मालकासह दारु पिणाऱ्यांवर बुधवारी रात्री कारवाई केल्याची माहिती निरीक्षक ए. जे. कुरेशी यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर ढाबे, हॉटेलमध्ये अवैधपणे दारुची विक्री करणारे आणि दारु पिण्यास जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील परिसरातील बहुतांश ढाब्यावर दारु पिणे बंद करण्यात आले आहे. मात्र, बुधवारी रात्री गांधेली परिसरातील बीड बायपास रोडवरील 'यारा दा ढाबा' येथे दारु पिण्यात येत असल्याची माहिती पथकास मिळाली.

त्यानुसार निरीक्षक कुरेशी, राहुल गुरव, दुय्यम निरीक्षक बालाजी वाघमोडे, गणेश इंगळे, बी.ए. दौंड, जी.एस.पवार, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, जवान विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे, अनिल जायभाये, गणेश शिंदे व ठाणसिंग जारवाल यांच्या पथकाने ढाब्यावर छापा मारला. या छाप्यात ढाबा मालक मखन सिंग चंदन सिंग काह्लो (रा. उस्मानपुरा) याच्यासह कमलेश शेषराव दाभाडे (रा. इंदिरानगर), किशोर रुपचंद शिंदे (रा. गजानननगर), निलेश नवलसिंग चंदनसे (रा. गांधेली), मनोज एकनाथ मिसाळ (रा. जयभवानीनगर), अभिजित मधुकरराव प्रधान (रा. अरिहंतनगर), प्रफुल्ल उत्तमराव प्रधान (रा. जवाहर कॉलनी), सुनील दिगंबर सोनवणे (रा. न्यू हनुमाननगर) यांना पकडण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी दारु पिल्याचेही स्पष्ट झाले. या कारवाईत ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध ठिकाणी दारु पिऊ नका शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही ढाबे, हॉटेलवर अवैधपणे दारु पिताना आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. तसेच ढाबा, हॉटेलमालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे अवैध ठिकाणी दारु पिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराच अधीक्षक संतोष झगडे यांनी दिला आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी