शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

घरटे तोडू नका, पक्षालाही होतो उष्माघात; जमिनीवर कोसळलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 12:16 IST

गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे मानवासहीत पशू पक्ष्यांचीही उन्हाने लाहीलाही होत आहे.

पैठण : उडता उडता उष्माघाताने जमिनीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास पैठण येथील पक्षीमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांच्या सतर्कतेमुळे सोमवारी जीवदान मिळाले आहे. गव्हाणे यांनी प्राथमिक उपचार केल्याने बरे वाटलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटाने पुन्हा आकाशात भरारी घेतली.

गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे मानवासहीत पशू पक्ष्यांचीही उन्हाने लाहीलाही होत आहे. उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. उन्हामुळे डीहायड्रेशनचा त्रास झाल्याने पक्षी रस्त्याच्या कडेला पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पैठण येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऑस्ट्रेलियन पोपट प्रा. संतोष गव्हाणे यांच्या घराच्या छतावर पडला. प्रा. गव्हाणे यांनी या पक्ष्याला तातडीने उचलून सावलीत आणून त्यास पाणी पाजले. दरम्यान, त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हळूहळू पोपटाच्या अंगावर पाणी शिंपडले. पोपटाला खायला घातले. यामुळे थोड्याच वेळात पोपट ताजातवाना होऊन पुन्हा आकाशात उडून गेला.

पक्ष्यांचे घरटे तोडू नकाउन्हाचा जास्त फटका बसल्याने पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे उडताना अचानक पक्षी खाली पडतात, असे पक्षीमित्र संतोष गव्हाणे यांनी सांगितले. विशेषतः ज्या पक्ष्यांची घरटी मोडली जातात, अशा पक्ष्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे या काळात कुणीही पक्ष्यांचे घरटे तोडू नये, घराच्या छतावर पाण्याची सोय करावी.-संतोष गव्हाणे, पक्षिमित्र

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSun strokeउष्माघात