शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वाद शिगेला; अंगणवाडी सेविकेचा कोयत्याने गळा चिरून पोस्टमन पतीने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:34 IST

वैजापूर तालुक्यातील घटना; पसार झालेल्या आरोपीस पोलिसांनी केली अटक

वैजापूर : घरगुती वादातून कोयत्याने गळा चिरून अंगणवाडी सेविकेचा तिच्या पोस्टमन पतीनेच खून केल्याची घटना तालुक्यातील राहेगाव येथे शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. अनिता चांगदेव शेलार (वय ५५) असे मयत महिलेचे नाव आहे.

राहेगाव येथील चांगदेव शेलार (वय ५९) हा पोस्टमन असून, तो पंढरपूर येथून शनिवारी सायंकाळी आला. त्यानंतर पत्नी अनितासोबत जेवण करून ते दोघे त्यांच्या खोलीत झोपले. त्यांचा मुलगा प्रवीण हा बजाजनगर येथे गेल्याने बाजूच्या खोलीत त्यांची सून मीना आणि तीन मुले झोपली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास आरोपी चांगदेव याने पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केला. यावेळी बाजूच्या खोलीतील सून मीना प्रवीण शेलार यांना आवाज आल्याने त्या जागी झाल्या. त्यांनी त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सासरे चांगदेव यांच्या हातात कोयता दिसला, तर त्यांची सासू अनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मीना यांना पाहताच चांगदेव पळून गेला. मीना यांनी याबाबतची माहिती नातेवाईक आणि शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा झाले. अनिताचा भाऊ वाल्मीक आवारे यांनी रक्तबंबाळ अवस्थेत अनिता यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. रविवारी दुपारी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

फिर्याद देण्यास नातेवाइकांची टाळाटाळयाप्रकरणी मयत अनिता शेलार यांच्या नातेवाइकांकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलार विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार प्रवीण पाटील हे करीत आहेत. मयत अनिता शेलार यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, असा परिवार आहे.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्नपत्नीचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव शेलार याने स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता, तो विहिरीत जिवंत आढळून आला. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला विहीरीतून बाहेर काढले, असता तो पुन्हा तेथून पळून गेला. त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शिऊर येथून अटक केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी