शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:08 IST

कुत्रा मालकावर गुन्हा; महिलेच्या हाताला आणि मनगटाला कुत्र्याने घेतला कडक चावा.

छत्रपती संभाजीनगर: शहरातील संजयनगर गल्ली क्रमांक २ मध्ये एका पाळीव कुत्र्याने नोकरीवर जाणाऱ्या महिलेवर भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मालकाने इशारा दिल्यानंतर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात ४१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, आरोपी कुत्रा मालक मिस्त्राम याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यात महिलेला फरफटत नेलेमिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला राजनगर येथील आरोग्य केंद्रात नोकरीला आहे. त्या नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता पायी कामावर जात होत्या. यावेळी आरोपी मिस्त्राम आपल्या कुत्र्यासह घरासमोर बसलेला होता. पीडित महिला जवळ येताच त्याने कुत्र्याला 'छू, गो' असे म्हणून चिथावणी दिली. मालकाचा इशारा मिळताच कुत्र्याने थेट महिलेवर झडप घातली आणि त्यांच्या हाताचा, तळहाताचा आणि मनगटाचा लचका तोडला. हल्ल्यामुळे महिला खाली पडताच कुत्र्याने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांच्या गुडघ्यालाही गंभीर इजा झाली आहे.

मालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हपाळीव कुत्र्याला अशा प्रकारे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर सोडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. जखमी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. पाळीव कुत्र्यांच्या वर्तणुकीला आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांना मालक किती जबाबदार आहेत, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pet dog attack: Woman severely injured after owner's command.

Web Summary : In Sambhajinagar, a pet dog attacked a woman after its owner instigated it. The dog bit and dragged the victim, causing serious injuries. Police have registered a case against the owner for negligence.
टॅग्स :dogकुत्राchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी