शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

तुमच्या मिठात आयोडीन आहे का? आता घराघरांतील मिठाची तपासणी करणार आरोग्य कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST

जागतिक आयोडीन न्यूनता विकार प्रतिबंध पंधरवडा

छत्रपती संभाजीनगर : आपण रोज खातो ते मीठ आयोडिनयुक्त आहे का? पण, हे ओळखण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना रोजच्या धावपळीच्या आयुष्यात थोडीच वेळ असतो. आयोडिनच्या कमतरतेमुळे गलगंड, थायरॉईडसह अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २८ ऑक्टोबरपासून जिल्हाभर ‘आयोडिनयुक्त मीठ तपासणी मोहिमे’ला सुरुवात केली आहे.

आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, आयोडिनची कमतरता हा ‘सायलेंट डिसीज’ असून, त्यामुळे बालकांमध्ये मानसिक विकासात अडथळे येतात, महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत होते तसेच गलगंड, थायरॉईडचे प्रमाण वाढते. म्हणूनच प्रत्येक घरात आयोडिनयुक्त मिठाचा वापर करणे गरजेचे आहे. या मोहिमेत पुढील १५ दिवस ग्रामीण भागातील घरांमधून, शाळा, वसतिगृहे, अंगणवाड्या येथून मिठाचे रॅण्डम नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. योग्य प्रमाणात आयोडिनयुक्त मिठाचा वापर होत आहे का, हे पाहणे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मूत्रनमुनेदेखील घेतले जाणार आहेत.

या मोहिमेत आरोग्य साहाय्यक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. नमुन्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने सुमारे दोन-तीन हजार किटदेखील कर्मचाऱ्यांकडे वितरित केले आहेत. एका किटमध्ये ५० टेस्ट होतात. शंकास्पद असलेल्या मिठाची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन ‘आयोडिन अभावमुक्त समाज’ घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. धानोरकर यांनी केले आहे.

दिवाळी सुटीमुळे लांबली मोहीमकेंद्र शासन व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात आयोडिन न्यूनता विकार प्रतिबंध जनजागृती पंधरवडा राबवायचा होता. परंतु, दिवाळीच्या सुटीमुळे ते शक्य झाले नाही. या मोहिमेची सुरुवात २८ ऑक्टोबरपासून करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगांवकर, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. सारिका लांडगे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र जोशी, सहायक प्रशासकीय अधिकारी चंद्रभान बनसोडे, अनिल गवळी, शशिकांत ससाणे, बी.एस. थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Health workers to check salt iodine levels in homes.

Web Summary : Health department starts campaign to check iodine levels in salt due to deficiency risks. Teams will test salt samples from homes, schools, and hostels. The goal is to ensure adequate iodine intake and prevent related diseases. Urinalysis of students will also be done.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न