शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

डॉक्टरचे फेसबुक खाते हॅक; मित्रांना गेले पैश्यांची मागणी करणारे मेसेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:22 IST

जवळपास १०० मित्रांना तातडीने पैसे हवे आहेत असे मेसेज गेले

ठळक मुद्देखाते हॅक झाल्याची माहिती वेळीच कळल्याने पुढील अनर्थ टळला.

परळी : शहरातील डॉ. अशोक लोढा यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील १०० मित्रांना पैश्याची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र फेसबुक खाते हॅक झाल्याची माहिती वेळीच कळल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी डॉक्टर अशोक लोढा यांनी शुक्रवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

परळी येथील दंतचिकित्सक डॉक्टर अशोक लोढा यांचे फेसबुकवर खाते आहे. यासोबतच  फेसबूक मेसेंजर ही त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. मात्र वेळेअभावी ते कधीच मेसेंजरचा वापर करत नाहीत. याचाच गैरफायदा घेत पुणे येथील एका व्यक्तीने त्यांचे हे मेसेंजर खाते हॅक केले आणि त्यांच्या मित्र यादीतील अनेकांना 'मला आता तातडीने दहा हजार रुपयांची आवश्यकता आहे, ऑनलाईन पाठवा' असे मेसेज पाठवले. अचानक डॉक्टरांचा मेसेज आल्यामुळे त्यांना खरोखरच पैशाची आवश्यकता असेल असे समजून अनेकांनी त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर  पैसे पाठवण्याची तयारी केली होती. 

असाच मेसेज पद्मावती भागातील नगरसेवक विजय भोईटे , प्रशांत जोशी यांना आला असता त्यांनी तातडीने डॉक्टर लोढा यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर लोढा यांनी लागलीच फेसबुकवरील मित्रांना माझे अकाऊंट हॅक झाले असून आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास ती देऊ नये असे मेसेज केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, डॉ. लोढा यांनी संशयित आरोपीची माहिती काढून शुक्रवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमBeedबीडPoliceपोलिसFacebookफेसबुक