शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

घाटीतील डॉक्टरांनी केले दोघांना चालण्यासाठी सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:19 IST

घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभाग आणि उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाने (सीव्हीटीएस) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघांना चालण्यासाठी सक्षम केले.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया : ६७ वर्षीय महिलेवर कृत्रिम सांधेरोपण, बायपास शस्त्रक्रियेने एकाचा वाचविला पायऔरंगाबाद : घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभाग आणि उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाने (सीव्हीटीएस) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघांना चालण्यासाठी सक्षम केले. यात अस्थिव्यंगोपचार विभागात एका ६७ वर्षीय महिलेवर संपूर्ण कृत्रिम सांधेरोपण केले. तर गँगरीन झालेल्या एका पुरुषावर पायाची बायपास शस्त्रक्रिया करून त्याचा पाय वाचविण्याची किमया ‘सीव्हीटीएस’ विभागातील डॉक्टरांनी साधली आहे.

आशा रमेशराव जाचक (रा.रामनगर) असे सांधरोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रफुल्ल पटेल (५७,रा. एन-७ हडको) असे पाय वाचविलेल्या रुग्णाचे नाव आहे. आशा जाचक या दोन वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या. त्यांनी राज्य कामगार रुग्णालयात दाखवले. तेव्हा त्यांनी घाटीत रेफर करण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी गुडघ्याचे कृत्रीम प्रत्यारोपण करण्याचे निदान केले. कुटुुुंबियांनी होकार दिल्यानंतर कृत्रीम गुडघा मागवण्यात आला. त्यानंतर अस्थिव्यंगोपचार विभागाचे पथक प्रमुख डॉ. मुक्तदिर अन्सारी, डॉ. अलफ पठाण, डॉ. अमोल भगस, डॉ. मिलींद लोखंडे, डॉ. श्रेयश घोटावडेकर,ी बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राजश्री सोनवणे, डॉ. सुचिता जोशी यांनी शनिवारी अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत सांध्याचे प्रत्यारोपण यशस्वी केले. नर्सींग होमच्या इंचार्ज एंगल्स सिस्टर, महेश पाठक यांचे सहकार्य मिळाले.

मधुमेहामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या उजव्या पायाला गँगरिन झाला होता. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पाय कापावा लागेल असे सांगितले होते. परंतु सीव्हीटीएस विभागातील डॉक्टरांनी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या पायाची बायपास शस्त्रक्रिया केली. डाव्या पायातून उजव्या पायात कृत्रिम रक्तवाहिनी जोडण्यात आली. पाच तास चालेल्या रक्तवाहिनीच्या या बायपास शस्त्रक्रियेमुळे त्याचा पाय वाचला. हृदयरोग, रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत मोरे, डॉ. सुचिता जोशी, डॉ. बीडकर यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले.

चौथ्या दिवशी चालू लागल्याचौथ्यादिवशी आशा जाचक या वॉकरच्या मदतीने चालु लागल्या. ‘टोटल नी रिप्लेसमेंट’च्या शस्त्रक्रियेला खाजगीत लाखांत खर्च येतो. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांच्या मार्गदर्शनात घाटीत शस्त्रक्रीया मोफत झाली. आरोग्य योजनेतही लवकरच होईल, असे डॉ. मुक्तदिर अन्सारी म्हणाले.

महिनाभरानंतर चालत आलेगँगरीनमुळे प्रफुल पटेल यांना चालनेही शक्य होत नसे. शस्त्रक्रि येच्या महिनाभरानंतर ते गुरुवारी सीव्हीटीएस विभागात स्वत: चालत आले. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठातांसह सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाल्याचे डॉ. प्रशांत मोरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद