शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पदमपुरा कोरोना सेंटरमध्ये रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करणारा डॉक्टर बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दाखल पॉझिटिव्ह महिला रुग्णावर मंगळवारी मध्यरात्री बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला ...

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात दाखल पॉझिटिव्ह महिला रुग्णावर मंगळवारी मध्यरात्री बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला गुरुवारी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बडतर्फ केले. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर धारेवर धरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाने सखोल माहिती घेऊन राज्य शासनाला अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रात्री २ वाजता हा प्रकार घडला होता. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना बुधवारी घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. भोंडवे यांनी गुरुवारी सकाळी चौकशी अहवाल प्रशासक यांना सादर केला. अहवालात पदमपुरा येथे आयुष डॉक्टर संदीप पंजरकर हा सीसीटीव्हीत महिलेशी लगट करताना अनेकदा दिसून आला. महिलेने दिलेल्या माहितीवरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून चौकशी अधिकाऱ्यांनी डॉ. पंजरकर दोषी असल्याचे अहवालात नमूद केले. या अहवालावरून प्रशासक पांडेय यांनी तडकाफडकी डॉ. पंजरकरला बडतर्फ केले.

नेमका प्रकार काय झाला

डॉ. सचिन पंजरकर याची गतवर्षी मे महिन्यात नेमणूक केली होती. तो पदमपुरा केंद्रात कार्यरत होता. दि. २३ फेब्रुवारीला पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला ५ मार्चला डिस्जार्ज दिला जाणार होता. मात्र ही महिला डिस्चार्जची मागणी करत होती. त्यामुळे पंजरकर याने रात्री २ वाजता महिलेला मोबाईलवरून संपर्क साधत, तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे, केबिनमध्ये या, असे सांगितले. यावेळी पंजरकर याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र बदनामीच्या भीतीने महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही.

विधिमंडळापर्यंत गेले प्रकरण

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टरला महापालिका प्रशासनाने बडतर्फ केल्याचे उत्तर दिले. त्यानंतर आ. अतुल सावे यांनी महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

-------

डॉक्टर आणि रुग्ण यांची जुनी ओळख

महापालिकेचा कंत्राटी डॉ. पंजरकर व संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये ४० मिनिटे गप्पा मारल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

--------

डॉक्टर होता लग्नासाठी सुटीवर

डॉ. पंजरकर हा स्वतःच्या लग्नासाठी महिनाभर सुटीवर होता. दोन दिवसांपूर्वीच तो रुजू झाला होता. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. मंगळवारी रात्री महिलेच्या नातेवाईकांनी कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेत पंजरकर याला बेदम चोप दिला होता.

पोलिसांनी घेतली सुमोटो दखल

विधानसभेत गुरुवारी सकाळी या प्रकरणाचे पडसाद उमटताच स्थानिक पोलीस आणि गुप्तवार्ता विभागाने संपूर्ण घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू केले. संबंधित डॉक्टर आणि चौकशी अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.

डॉक्टरने आत्महत्या केल्याची अफवा

महापालिका प्रशासनाने गुरुवारी सकाळी डॉ. सचिन पंजरकर याला बडतर्फ केल्याची वार्ता सर्वत्र पसरली. त्यानंतर सचिन याने आत्महत्या केल्याची अफवा पसरली होती. दुपारी पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.