शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का? ‘सारथी’ संस्थेकडून संशोधक विद्यार्थ्याची छळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:56 IST

संशोधनासाठी मंजूर केलेले विषय व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना तुच्छतेची वागणूक

ठळक मुद्देया मुलाखतीमध्ये इतर प्रवर्गातील प्राध्यापकांची नेमणूकविद्यापीठाने मंजूर केलेले संशोधन विषय नाकारले.

औरंगाबाद : नव्यानेच स्थापन झालेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनासाठी मंजूर केलेले विषय व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना तुच्छतेची वागणूक मिळाली आहे. सारथी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी नुकत्याच मुलाखती दिल्या आहेत. त्याठिकाणी तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का? असा प्रश्न विचारल्याचेही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनीही अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांच्या २२ आॅगस्ट रोजी पुणे येथे मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमध्ये विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक मानसिक छळवणूक करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये इतर प्रवर्गातील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी विद्यापीठाने मंजूर केलेले संशोधन विषय नाकारले. एवढेच नव्हे तर या विषयावर संशोधन होऊ शकत नाही म्हणून अपमान केला. तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का?  असा हेटाळणी करणारा प्रश्न विचारल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सर्वच विद्यार्थ्यांचे संशोधन विषय, प्रस्ताव आणि आराखडे चुकीचे, अपूर्ण असल्याने ते बदलावे लागतील, अशी अटही घालण्यात आली. काही विद्यार्थ्यांना  संशोधन विषय संबंधित विषयाशी निगडित नसल्याचेही सांगण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलच विद्यार्थ्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाळगून मुद्दाम डावलल्याची शक्यताही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन एसईबीसी वेलफेअर असोसिएशनतर्फे देण्यात आले आहे. 

१३ प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणारसारथी संस्थेतर्फे एम. फिल., पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या १३ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी महिनाभरापूर्वी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. 

टॅग्स :Studentविद्यार्थीDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीMarathwadaमराठवाडा