शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

' काहीतरी करा ! हा रस्ता मला छळतोय'; त्रस्त महिलेची पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 15:45 IST

औरंगाबादमध्ये महिलेने चक्क रस्त्याविरोधात तक्रार केल्याने पोलीसही चक्रावले

ठळक मुद्देनितीन गडकरी यांनी निर्देश देऊनही रस्ता कामात गती आलेली नाही. 

औरंगाबाद : शहरातील एका महिलेने औरंगाबाद ते फुलंब्री रस्ता मला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास व्हावा म्हणून आपली अडवणूक करत  कसल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. आजवर एखाद्या व्यक्तीपासून त्रासमुक्त करण्यासाठी तत्पर पोलीससुद्धा एका प्रयोग शाळा तंत्रज्ञ महिलेने केलेल्या या तक्रारीने गोंधळात पडले आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी नागरी उड्डयनमंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश देऊनही कामात गती आलेली नाही. 

संध्या घोळवे-मुंडे असे तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या औरंगाबाद शहरात राहत असून फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या १४ वर्षांपासून त्या येथे कार्यरत असून रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा अप-डाउन प्रवास करत असतात. या रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने प्रवास्यांना अनंत यातनांना सामोरे जावे लागत आहे. मुंडे यांनासुद्धा दररोज खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांनी थेट औरंगाबाद-फुलंब्री या रस्त्या विरोधातच पोलिसात तक्रार केली आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, रस्त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा, अशी मागणी संध्या घोळवे-मुंडे यांनी केली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचंही  यांनी सांगितले आहे. हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की व अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल, त्याच्यामध्ये काही बदल होईल, अशी मला आशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला असेही त्यांनी म्हटलं आहे. 

नितीन गडकरींच्या निर्देशानंतरही रस्त्याचे काम अर्धवट मागील दोनवर्षांपेक्षा जास्त काळापासून औरंगाबाद- जळगाव या रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र, याचे काम करणारा पहिला कंत्राटदार काम अर्ध्यावर टाकून पळून केला. यानंतर दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी नागरी उड्डयनमंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश देऊनही कामात गती आलेली नाही. औरंगाबाद - फुलंब्री हे अंतर ३० किमी असून यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. ही वाहतूक एकेरीच होत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग