शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:38 IST

Aurangabad Municipal Corporation शहरातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देमालमत्ता करावरील व्याज, दंड माफ करण्याची व्यापारी महासंघाची मागणी

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यापाऱ्यांची आर्थिक अवस्था अत्यंत डबघाईला आली आहे. जवळपास तीन महिने दुकाने बंद ठेवावी लागली होती. व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावू नये, अशी मागणी मंगळवारी जिल्हा व्यापारी महासंघाने मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेने व्यवसायिक मालमत्ता करावर लावलेले व्याज, दंड माफ करावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

शहरातील व्यापाऱ्यांना परवाना शुल्क लावण्याची प्रक्रिया मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. व्यापाऱ्यांना आत्तापर्यंत शुल्क आकारणी का केली नाही, अशी विचारणा शासनाकडून मनपाला करण्यात आली आहे. शुल्क आकारणी केल्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपाला देण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालमत्ता करासोबतच परवाना शुल्क वसूल करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाकडून अंतिम मंजुरी देण्यासंदर्भात कारवाई सुरू आहे. ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात परवाना शुल्काचा व्यापाऱ्यांवर बोजा? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. मंगळवारी दुपारीच औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे शिष्टमंडळ मनपात दाखल झाले. त्यांनी करमूल्य निर्धारण विभागाच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, तनसुख झांबड, गुलाम हक्कानी, राजेंद्र मुंडलिक, संतोष कव्हाळे आदींची उपस्थिती होती.

कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसानकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपासन तीन महिने दुकाने बंद होती. व्यापाऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शासनाकडून व्यापाऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. अशा अडचणीच्या वेळी व्यापाऱ्यांकडून परवाना शुल्क घेणे उचित नाही. व्यापारी अगोदरच मनपाला व्यावसायिक स्वरूपात मालमत्ता कर अदा करीत आहेत. मालमत्ता करावर लावण्यात आलेल्या व्याज, दंडाच्या रकमेवर सूट द्यावी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका