शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

'स्वतःला फसवू नका'; शिक्षिकेचे ‘ते’ एक वाक्य ठरले आयुष्यभराची शिदोरी : उदय चौधरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 19:38 IST

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी केलेल्या संस्कारांच्या ज्ञानशिदोरीतून घडलो

ठळक मुद्देशिक्षकाविना जिल्हाधिकारी झालो नसतो...इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील यश लक्षणीय ठरले.  

औरंगाबाद : शिक्षकांनी संस्काराच्या रूपाने केलेले मार्गदर्शन आयुष्यभर ज्ञानशिदोरी म्हणून एक महत्त्वपूर्ण ठेवा असतो. माझ्या आजवरच्या प्रवासात शिक्षकांचे योगदान बहुमूल्य असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला प्रत्येक टप्प्यावर योग्य शिक्षक मिळाले. प्राथमिक शाळेपासून, माध्यमिक शाळेपर्यंत सर्व शिक्षक चांगलेच मिळाले. शिक्षक दिनानिमित्त सांगावेसे वाटते की, संस्कृतच्या शिक्षिका मीरा फडणीस यांची आठवण माझ्याकडे एक ठेवा आहे. त्यांनी जे सांगितले, ते आजही मनात आहे, जेव्हा तुम्ही कोणत्याही पदावर काम कराल, त्यावेळी तुम्ही घरच्यांना फसवू शकाल, इतरांना फसवाल; परंतु स्वत:च्या मनाला फसवू शकणार नाही. त्यामुळे कुठलीही कृती करताना कितीही गुपचूप काही केले तर अंतर्मनातील ईश्वर तुम्हाला बघत असतो. तेच वाक्य आजवर माझ्या मनात कायम आहे.

कुठलेही गैरकृत्य माझ्या हातून होण्यापूर्वी ते मार्गदर्शन आधी माझ्या समोर येते. १८ ते १९ वर्षांपासून मी याच वाक्यावर माझी वाटचाल केली आहे. हेच माझ्या लक्षात आहे. आपले मन कधीही आपल्याला माफ करू शकणार नाही. अशी चूक माझ्याकडून तरी आजवर झालेली नाही. जिल्हाधिकारी चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण सु.ग. देवकर प्रा.विद्यालय, जळगाव, आणि माध्यमिक लालजी नारायण विद्यालय, जळगाव येथे झाले. त्यानंतर पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातच त्यांनी आयएएससाठी प्रशिक्षण घेतले.

आयपीएस अधिकाऱ्याचे मित्ररूपी मार्गदर्शनशिक्षक मित्र आयएएसच्या अभ्यासातून झाले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीत शिक्षक, प्राध्यापक असे कुणी नसते. एक मात्र त्या ठिकाणी झाले. रवी पाटील म्हणून आयपीएस अधिकारी आहेत. २००४ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते सध्या सायबर सुरक्षा तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मित्रत्वाच्या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे आयएएस होणे शक्य झाले.

माझी आई विसरलेली नाहीकुलकर्णी नावाच्या शिक्षिकेने सांगितले होते, तुला माहिती नाही, तुझा मुलगा काय आहे. आम्हाला माहिती आहे, तू बघ तुझा मुलगा जिल्ह्यात पहिला येणार. कौटुंबिक परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे आईला त्यांचे खूप नवल वाटले नाही. माझे परीक्षेत पहिले येणे आईला सामान्यच वाटले. मात्र, पुढे वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळाल्यानंतर शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व समजले. कुलकर्णी यांचा शब्द अजूनही आई विसरलेली नाही. 

शाळकरी जीवनातील क्षणमी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षिका उज्ज्वला कुलकर्णी होत्या. इयत्ता चौथीमध्ये त्यावेळी स्कॉलरशिपच्या परीक्षा होत्या. परीक्षा झालेली होती. स्कॉलशिप परीक्षेच्या निकालापूर्वी शिक्षिका कुलकर्णी आईला म्हणायच्या उदय काय आहे, हे तुला महिती नाही. आम्हाला माहिती आहे. त्यावेळी माझ्या आईला असे वाटायचे हा वर्गात व शाळेत हुशार आहे, काही तरी काम धंदा करील.

( शब्दांकन : विकास राऊत ) 

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबाद