शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा -शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:04 IST

वेरूळ येथील अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची थाटात सांगता

वेरूळ : वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, असा उपदेश जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी येथे केला. अधिक मासानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात ४ जूनपासून सुरू असलेल्या अतिरुद्र अभिषेक सोहळ्याची सांगता शुक्रवारी थाटात करण्यात आली.यंदा दर्भतीर्थाने (कुश) पाच दिवस घृष्णेश्वरास अतिरुद्र अभिषेक करण्यात आला. यामुळे पाच दिवस गाभारा दर्शन बंद ठेवण्यात आले होते. भाविकांना या काळात सभामंडपातूनच दर्शन घ्यावे लागले. शुक्रवारी करवीर पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी, समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, विद्यावामदेवानंद तीर्थस्वरूप टाकास्वामी वेरूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता झाली.यावेळी शंकराचार्यांनी सांगितले की, अधर्माने माणूस वागला की, पापाचा संचय वाढतो, पापाचे दुसरे नाव म्हणजे अधर्म आणि दु:ख आहे. त्यामुळे वाईट कर्म करू नका, चांगले कर्म करा, सत्याचा संकल्प करा, यामुळे पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा उदय होतो व सुख मिळते, असे अनेक दाखले देत त्यांनी भाविकांना उपदेश केला.अतिरुद्र अभिषेकाच्या काळात २५१ ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात घृष्णेश्वर महादेवास अतिरुद्र या पूजा प्रकारात १४,६४१ अभिषेक म्हणजे ११ महारुद्र संपन्न झाले. अखंडित चाललेल्या या अतिरुद्रास तीन तासांकरिता एका वेळी चाळीस ब्रह्मवृंद मंत्रपठण करीत होते. यावेळी तांदळाचा सर्वतोभद्र मंडल बनविण्यात आला होता.सांगतेप्रसंगी गरीब, शेतकरी, दिव्यांग बांधवांना शिधा व वस्त्र वाटप करण्यात आले. यावेळी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले, राजेंद्र पवार, विष्णू महाराज, शिवाभाऊ अंगूलगावकर, देवस्थान अध्यक्ष दीपक शुक्ला, अतिरुद्र अध्यक्ष परेश पाठक, कार्यकारी विश्वस्त कमलाकर विटेकर, मुख्य पुजारी रवी पुराणिक, संजय वैद्य, योगेश टोपरे, शशांक टोपरे, सुनील शास्त्री, सुनील विटेकर, रावसाहेब शास्त्री यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती होती. प्रास्ताविक अ‍ॅड. मिलिंद जोशी यांनी केले. महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

टॅग्स :TempleमंदिरSocialसामाजिक