शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 18:15 IST

‘एमएसआरडीसी’कडे ४१.१४ कोटी आगाऊ रक्कम जमा

- विजय सरवदेऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची ( DMIC ) कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. दरम्यान, जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी एमआयडीसीला एकूण ८ एकर भूसंंपादन करावे लागणार आहे. तथापि, समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला एमआयडीसीकडून ४१.१४ कोटींची आगाऊ रक्कम प्राप्त झाली आहे.

प्राप्त रकमेतून ‘एमएसआरडीसी’कडून समृद्धी महामार्गावर केवळ इंटरचेंज उभारले जाणार आहे. इंटरचेंजपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत जवळपास ९०० मीटर लांबीचा रस्ता एमआयडीसीला करावा लागणार आहे. इंटरचेंजसाठी ४ एकर आणि रस्त्यासाठी ४ एकर असे एकूण ८ एकर भूसंपादन एमआयडीसीला करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना एमएसआरडीसीने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा पाच पट मावेजा दिला होता. तेवढाचा मावेजा एमआयडीसीने द्यावा, या मुद्यावर शेतकरी अडले आहेत. तथापि, एमआयडीसीने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या असून त्यावर हरकती, खुलासे मागविण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जानेवारीअखेरपर्यंत भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘डीएमआयसी’ या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर या शहराची दळणवळणाची सुविधा उत्तम असायला हवी. यासाठी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली पाहिजे. येथून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी रेल्वेसेवा व रस्त्याची सुविधा असायला हवी. दुसरीकडे औरंगाबादेतून जाणाऱ्या ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी असावी, अशी उद्योग संघटनांची अपेक्षा आहे.

वाहतुकीला अडथळा येणार नाही‘एमआयडीसी’कडून भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथून पुढे तीन ते चार महिन्यांत समृद्धी महामार्गावर इंटरचेंज उभारणीचे काम पूर्ण होईल. तत्पूर्वी, जर या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली, तरीही कनेक्टिव्हिटीच्या कामाचा अडथळा येणार नाही. मात्र, इंटरचेंज व एमआयडीसीच्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच समृद्धी महामार्गावरून ‘डीएमआयसी’ची वाहतूक सुरू होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबादAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटी