डीएमईआरकडून घाटीला ८.२२ कोटींच्या यंत्रखरेदीला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:06 AM2021-01-16T04:06:37+5:302021-01-16T04:06:37+5:30

औरंगाबाद : जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) १६ प्रकारची २२ यंत्रसामुग्री खरेदीस वैद्यकीय शिक्षण व ...

DMER approves purchase of machinery worth Rs 8.22 crore | डीएमईआरकडून घाटीला ८.२२ कोटींच्या यंत्रखरेदीला मान्यता

डीएमईआरकडून घाटीला ८.२२ कोटींच्या यंत्रखरेदीला मान्यता

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) १६ प्रकारची २२ यंत्रसामुग्री खरेदीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) तांत्रिक मान्यता दिली. यात साडेचार कोटींच्या सिटीस्कॅन यंत्राचा समावेश असून, जुने सहा स्लाईस सिटीस्कॅन यंत्र देऊन त्या जागी १६ स्लाईस यंत्र खरेदी करण्यात येणार असल्याने रुग्ण निदान घाटीत आणखी सोयीचे होणार आहे.

घाटी रुग्णालयाला जिल्हा वार्षिक योजनेतून २०२०-२१ या वित्तीय वर्षात ८ कोटी ४२ लाख ६२ हजार एवढे सुधारित अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यातून यंत्र व सामग्री खरेदीसाठी ८ कोटी २२ लाख ९६ हजार रुपयांच्या १६ प्रकारची २२ यंत्रसामग्री खरेदीला तांत्रिक मान्यता डीएमईआरकडून मिळाली आहे. यात इएनटी ऑपरेटिंग मायक्रोस्कोप, २ टुडी इको कार्डिओग्राफी यंत्र, २ इसीजी मशीन, अनेस्थेशिया वर्क स्टेशन, स्ट्रेटस टीएमटी यंत्र, ३ बायफेजिकल डिफेब्रिलेटर, ३ मल्टिपॅरा मॅानिटर, ॲडव्हान्स युएसजी कलर डाॅपलर, १६ स्लाईस सिटीस्कॅन यंत्र, व्हेंटिलेटर, पोर्टेबल एक्सरे मशीन, केमिल्युमिनीसन्स ॲलानालायझर अशा महागड्या आणि महत्त्वाच्या यंत्राचा यात समावेश आहे.

Web Title: DMER approves purchase of machinery worth Rs 8.22 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.