शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नाडी जलद होऊन चक्कर, असू शकतो 'कार्डियाक अरेस्ट'; 'हा' उपाय केला तर वाचेल जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:54 IST

प्रत्येक वेळी हार्ट अटॅकच नसतो; दुर्लक्ष करणे पडेल महागात; अशा वेळी ‘सीपीआर’ने ५० टक्के रुग्णांना वाचविणे शक्य

छत्रपती संभाजीनगर : नाडी अचानक जलद होते आणि व्यक्ती कोसळते. ही परिस्थिती ‘सडन कार्डियाक डेथ’कडे नेणारी ठरू शकते. मात्र, रुग्णाला वेळीच ‘कार्डियो पल्मोनरी रिसॅसिटेशन’ म्हणजेच ‘सीपीआर’ दिल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. ‘सीपीआर’मुळे जवळपास ४० ते ५० टक्के रुग्णांचा जीव वाचतो. त्यामुळे प्रत्येकाने ‘सीपीआर’ क्रिया शिकली पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

शहरात शनिवारी आणि रविवारी ‘सडन कार्डियाक डेथ’ या विषयावर परिषद पार पडली. या परिषदेत रविवारी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मुंबई येथील डाॅ. आशिष नाबर म्हणाले, अनेकदा रुग्णाला हृदयाचा आजार आहे, हेच माहीत नसते. नाडी अचानक जलद होते आणि व्यक्ती कोसळतो, याला ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ म्हणतात. हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला, हृदय कमकुवत असणाऱ्यांनी याबाबत वेळीच निदान करून घेतले पाहिजे. पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेल्या रुग्णांसोबत असे होते. तेव्हा दुसऱ्यांदा हार्ट अटॅक आला, असे म्हटले जाते. परंतु, प्रत्येक वेळीच हार्ट अटॅक आलेला असतो, असे नाही.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी डाॅ. विनोद गोसावी, डाॅ. गीता फेरवाणी, डाॅ. अमरजा नागरे, डाॅ. रंजित पालकर, डाॅ. सचिन मुखेडकर, डाॅ. श्रीकांत देशपांडे, डाॅ. शरद बिरादार यांनी ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आणि ‘ॲडव्हान्स कार्डियाक लाईफ सपोर्ट’वर मार्गदर्शन केले आणि प्रशिक्षण दिले.

श्वास, शुद्ध, नाडी नसेल तर...पुणे येथील डाॅ. राजेश धोपेश्वरकर म्हणाले, प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सीपीआर शिकले पाहिजे. श्वास, शुद्ध आणि नाडी लागत नसेल तर रुग्णाला सीपीआर दिले पाहिजे. मुंबई येथील डाॅ. सौरभ देशपांडे म्हणाले, रुग्णाला ‘सीपीआर’ दिल्याचा फायदा होतो. प्रत्येक रुग्णाला वेळीच रुग्णालयात पोहोचविले पाहिजे.

पोलिसांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षणहृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अजित भागवत म्हणाले, परिषदेच्या पहिल्या दिवशी शनिवारी १२० पोलिसांना ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्यात आले. यापुढेही विविध ठिकाणी ‘सीपीआर’चे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. या परिषदेत जवळफास १४० तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादHeart Diseaseहृदयरोग