शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

दिवाळीत मी गोडधोड खाणार... या फासेपारधी मुलांचे काय?

By गजानन दिवाण | Updated: October 25, 2018 14:25 IST

‘यांचीही दिवाळी गोड करा’ उपक्रमाबाबत मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांची विशेष मुलाखत

- गजानन दिवाण

तसे पाहिले तर दिवाळी पूर्वीसारखी हवीहवीसी राहिली नाही. घरात रोज गोडधोड होते. हवे त्यावेळी कपडेलत्ते मिळतात. वाटेल त्यावेळी भेटीगाठीही होतात. मग दिवाळीचे वेगळेपण काय? तरी आम्ही अगदी दणक्यात दिवाळी साजरी करतो. तशी ती यावर्षीही करू. ऐपतीप्रमाणे खरेदीही करू. पण, ज्यांची रोज भाजी-भाकरी खाण्याची मारामार त्यांच्या दिवाळीचे काय? 

या विचाराने अस्वस्थ झालेले जालन्यातील ‘मैत्र मांदियाळी ग्रुप’चे अजय किंगरे यांनी ‘यांचीही दिवाळी गोड करा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत. 

नेमका काय आहे हा उपक्रम?- प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार दिवाळी साजरी करेल. पण ज्यांची काहीच ऐपत नाही अशांचे काय, या विचारातूनच हा उपक्रम जन्माला आला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहोत. प्रत्येक मुलाला ३०० रुपये लागतात. दरवर्षी साधारण एक ते दीड लाख रूपये खर्च येतो. या मुलांना दिवाळीत करंजीपासून चकलीपर्यंत सर्व फराळ दिला जातो. 

कोण आहेत ही मुले?- अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे मतीन भोसले यांनी फासेपारधी मुलांची ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली आहे. साडेचारशे मुलांचा हा संसार आहे. महिन्याला किमान एक लाख रूपयांचा किराणा लागतो त्यांना. कुठलेही अनुदान नसताना त्यांची जगण्याची कसरत सुरू आहे. दररोज खाण्याची मारामार असलेल्या या मुलांची दिवाळी कशी असेल? या सर्व मुलांना आम्ही हा फराळ देतो. याशिवाय जालन्यातील १२४ एडस्ग्रस्त मुलांनाही दिवाळी फराळ देतो. 

‘प्रश्नचिन्ह’ला तुम्ही किराणा देखील भरुन देता...- होय. गेल्या काही वर्षांपासून दर महिन्याला आम्ही त्यांना किराणा भरुन देतो. तेल-मीठापासून अगदी शाम्पूपर्यंत सामान त्यांना पाठविले जाते. गेल्या काही महिन्यांत त्यांना मिळणारी मदत काहीसी वाढल्याने आता दर महिन्याला किराणा पाठवावा लागत नाही. पण, गरज भासली की आम्ही पाठवतो. 

यासाठी पैसा?- मैत्र मांदियाळी ग्रुपमध्ये राज्यभरातून १२५ सदस्य आहेत. आम्ही सर्वजण महिन्याला २०० रुपये जमा करतो. शिवाय औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही दुकानांमध्ये मदतीसाठी बॉक्स ठेवले आहेत. ‘एक दिवस दत्तक’ या योजनेत काही लोक मदत करीत असतात. अशा माध्यमातून पैसा जमतो. वेळ लागतो. पण, कमी नाही पडत. 

फराळाशिवाय काही देता का?- मागच्यावर्षी एका विदेशी नागरिकाने ५५ हजारांची मदत दिली. सर्व मुलांना फराळ दिल्यानंतरही पैसे वाचले. मग ‘प्रश्नचिन्ह’च्या ४५० मुलांना कपडेही घेतले. 

आपला शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम काय आहे?- आम्ही जवळपास ३५ मुले या उपक्रमांतर्गत दत्तक घेतले आहेत. यावर महिन्याला साधारण ५० हजार रुपये खर्च होतात. हुशार आहेत, पण गरीबीमुळे पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत मदत केली जाते. विदर्भातील दोन मुलांनाही याअंतर्गत मदत केली आहे. या उपक्रमातील एक विद्यार्थी लवकरच पीएसआय होण्याच्या मार्गावर आहे. हेच आमचे मोठे यश आहे. 

‘मी आणि माझे’ असा विचार मोठ्या प्रमाणात होत असताना हे सारे कसे जमते?- यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. उघड्या डोळ्याने आणि खुल्या मनाने आजूबाजूला पाहिले की ते आपोआप घडते. कोणीतरीकशाच्या तरी माध्यमातून सुरूवात करतो आणि ती चळवळ बनते. ‘मैत्र मांदियाळी’चेही असेच आहे. 

अजय किंगरे यांचा संपर्क :  ajaykingre@gmail.com

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक