शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिवाळी संपेना; कार्यालयात १०.३० वाजेपर्यंत सन्नाटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:41 IST

मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयात तुरळक, तर जि.प.त सर्वाधिक उपस्थिती

ठळक मुद्देप्रलंबित कामासाठी दिवाळीच्या सुटीनंतर नागरिक कार्यालयांच्या चकरा मारत आहेत.अधिकारी-कर्मचारी दिवाळीच्या मूडमधून बाहेर आले नाहीत

औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्या संपून आठवडा उलटला. मात्र, अद्याप सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दिवाळी फिवर संपलेला नाही. लोकमत टीमने जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी १०.३० पूर्वी किती कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते, याची पाहणी केली. त्यात जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयात ७० टक्के अधिकारी, कर्मचारी कार्यालयात आले नव्हते. तर जिल्हा परिषदेत ९० टक्के कर्मचारी उपस्थित होते. 

सध्या कोरोनाचा कहर कमी झाल्याने प्रलंबित कामासाठी दिवाळीच्या सुटीनंतर नागरिक कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. त्यात अधिकारी-कर्मचारी दिवाळीच्या मूडमधून बाहेर आले नसल्याने अभ्यागतांच्या खेट्या सुरूच आहेत. नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांची मुख्यालयातील उपस्थिती गरजेची असल्याचे मत जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांची उपस्थिती कर्मचारी मात्र तुरळकसकाळी १० वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनमध्ये २ जण सफाई करीत होते, तर १ कर्मचारी कामात होते. महसूलमध्ये १ लिपिक, रोहयोत एक पोलीस, तीन कर्मचारी, गृहविभागात १ कर्मचारी, पुरवठा विभागात २ लिपिक, १ कर्मचारी, भूसंपादनमध्ये ४ जण उपस्थित होते. 

मनपात निम्म्याहून अधिक गायबसकाळी १०.२० वाजता :  मनपाच्या आरोग्य विभागात पीसीपीएनडीटी विभागात दोन कर्मचारी तर दोन कर्मचारी बाहेर बसलेले होते. लेखा विभागात चार जण, वित्त विभागात दोन कर्मचारी पाच लिपिक, नगरसचिव दालनात ३ जण तर आयुक्त दालनात सर्व कर्मचारी उपस्थित होते. तर एकही वरिष्ठ अधिकारी मुख्य प्रशासकीय इमारतीत दिसले नाही.

जिल्हा परिषदेत बहुतांश कर्मचारी हजरसकाळी १० : ४० वाजता : आरोग्य विभाग, वाॅर रूम, सामान्य प्रशासन विभागात कर्मचारी, अधिकारी हजर होते. पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, सिंचन विभागात अधिकाऱ्यासह कर्मचारी उपस्थित दिसून आले. वित्त विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता, अभियंते हजर होते. तर निम्मे अधिक कर्मचारी मात्र, दिसून आले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद