मनपात दिवाळी धूमधडाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:39 IST2017-10-07T00:39:28+5:302017-10-07T00:39:28+5:30

महापालिकेतील कर्मचा-यांची दिवाळी यंदा अत्यंत धूमधडाक्यात साजरी होणार आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यंदा कर्मचा-यांवर बरेच मेहरबान झाले असून, दिवाळीनिमित्त सुमारे चार हजार कर्मचा-यांना तब्बल दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.

Diwali celebration for AMC employees | मनपात दिवाळी धूमधडाक्यात

मनपात दिवाळी धूमधडाक्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचा-यांची दिवाळी यंदा अत्यंत धूमधडाक्यात साजरी होणार आहे. प्रशासन आणि पदाधिकारी यंदा कर्मचा-यांवर बरेच मेहरबान झाले असून, दिवाळीनिमित्त सुमारे चार हजार कर्मचा-यांना तब्बल दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. अग्रिम म्हणून १० हजार रुपये आणि ३५०० रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिवाळी भेटची घोषणा केली. यावेळी मुख्य लेखाधिकारी राम सोळुंके, लेखाधिकारी नजीर दुर्राणी आदींची उपस्थिती होती.
९३५ कर्मचाºयांना अग्रीम
मनपातील ज्या कर्मचा-यांचे ग्रेड वेतन ४८०० रुपयांपेक्षा कमी आहे, अशा वर्ग-३ आणि वर्ग-४ मधील ९३५ कर्मचा-यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे अ‍ॅडव्हान्स (अग्रीम) दिले जाणार आहे. याकरिता ९२ लाख ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा कपात केली जाईल.
२७१५ कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान
मनपाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचे १८०० पेक्षा कमी ग्रेडवेतन असलेल्या २७१५ कर्मचा-यांना मागील वर्षी देण्यात आलेल्या २४१९ रुपयांऐवजी ३५०० रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

Web Title: Diwali celebration for AMC employees