शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांनी प्रियदर्शनी उद्यानाची पाहणी करून सल्ला द्यावा : खंडपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 16:37 IST

विभागीय आयुक्तांनी सरकारी वकिलांकडील या जनहित याचिकेच्या कागदपत्रांचे अवलोकन करावे, असेही खंडपीठाने सुचविले आहे.

औरंगाबाद : प्रियदर्शनी उद्यानाची स्वतंत्र पाहणी करून परिसराचा योग्य विकास व नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणी प्रकल्प अधिक लोकोपयोगी व सुकर व्हावा यासाठी सल्ला द्यावा, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना सरकारी वकिलांमार्फत केली आहे.

विभागीय आयुक्तांनी सरकारी वकिलांकडील या जनहित याचिकेच्या कागदपत्रांचे अवलोकन करावे, असेही खंडपीठाने सुचविले आहे. या जनहित याचिकेवर २ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २.३० ला सुनावणी होणार आहे.

वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समिती‘ग्रीन लंगस्’ अशी ओळख असलेल्या या परिसरातील वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडल्याचा याचिकाकर्त्यांनी आरोप केलेला आहे. हा प्रकल्प केवळ ६५,७८७ चौरस मीटरचा असल्याचा उल्लेख असला तरी मनपाच्या वास्तुविशारदांनी दाखल केलेल्या आराखड्यावरून संपूर्ण उद्यान व्यापल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येते, असे निरीक्षण नोंदवीत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच स्मारक अधिक सोयी-सुविधांयुक्त व्हावे, यासाठी खंडपीठाने ॲड. संतोष यादव-लोणीकर, ॲड. जी. आर. सय्यद आणि ॲड. महेंद्र नेरलीकर यांची समिती स्थापन केली. त्यांनी उद्यानाची पाहणी करून सल्ला देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. याचिकाकर्ते आणि मनपाचे वकील आनंद भंडारी यांनी या समितीला उद्यानाचा नकाशा, आराखडा आणि एनजीओचा अहवाल उपलब्ध करून द्यावा, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

काय आहे याचिकासिडकोतील प्रियदर्शनी उद्यान २०१६ मध्ये सिडको प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरित केले. महापालिकेने उद्यानातील झाडे तोडून पुनर्रोपणही केले नाही. तेथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक बनविण्याचे जाहीर केल्यानंतर २०१९ मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी ॲड. सनी खिंवसरा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती. शहरासाठी ऑक्सिजनची निकड प्रियदर्शिनी उद्यानामुळे पूर्ण होत असल्याचे याचिकेत म्हटले हाेते. महापालिकेने या उद्यानात नव्याने १० कोटी निधीची तरतूद करून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, म्युझियम, फूड कोर्ट आणि एएमसी थिएटर उभारणीस प्रारंभ केला होता. खंडपीठाने जनसहयोग संस्थेमार्फत अहवाल मागवून, बांधकामासंबंधी ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. जनसहयोगतर्फे ॲड. शुभम अग्रवाल, मनपातर्फे ॲड. आनंद भंडारी, तर सिडकोतर्फे ॲड. अनिल बजाज काम पाहत आहेत.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद