शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्य शिवोत्सव! पंधरा हजार पणत्यांनी साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 18:49 IST

१५ हजार पणत्या अवघ्या २२ मिनिटांत पेटविण्यात आल्या

पैठण: डोळे दिपवून टाकणारे व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा १५ हजार पणत्या प्रज्वलित करून साकारण्याची किमया शहरात साध्य झाली. आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेच्यावतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन एकर क्षेत्रात ही प्रतिमा साकारण्यात आली. त्यानंतर ३५० गगनभेदी रंगीबेरंगी फटाके वाजवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षवेधी प्रतिमेस सलामी देण्यात आली. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शाळेच्या मैदानावर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आर्य चाणक्य विद्या मंदिर शाळेच्यावतीने दुर्ग भ्रमंती नंतर मंगळवारी  दिव्याच्या माध्यमातून छत्रपतींची प्रतिमा साकारली. यावेळी ५४ किलो फुले, ४५ किलो रांगोळीच्या सहायाने "दिव्य शिवोत्सव व राजमुद्राही " साकारण्यात आली होती. छत्रपतींची प्रतिमा साकारण्यासाठी १५ हजार पणत्या, १०५ लिटर तेल, ३० हजार वाती, ५४ किलो फुले, ४५ किलो रांगोळी व ८×१६ चा भगवा ध्वज आदी साहित्य लागले, असे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले.

१५ हजार पणत्या अवघ्या २२ मिनिटांत पेटविण्यात आल्याजसजसे पणत्या पेटत होत्या तसतशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आकार येत होता. हे पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दणाणून जात होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुगलकिशोर लोहिया, मार्गदर्शक म्हणून डॉ. जयंत जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून  महेश चन्ने, डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्य शिवोत्सव कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष आहेर, सुदाम पोल्हारे, विकास देशमुख, सर्फराज अंबेकर, गणेश माळवदकर, मनोज शिंगारे, प्रियंका निकाळजे, राखी धोकटे, गीतांजली शेवतेकर आदी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, रिक्षा चालक-मालक, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी  परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन विलास खर्डेकर व शिखा शाह यांनी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज