शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा कार्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या चर्चेचा विषय बनत असून गुरुवारी हे कार्यालय चक्क वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले.

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा कार्यालय सध्या चर्चेचा विषय बनत असून गुरुवारी हे कार्यालय चक्क वाऱ्यावर असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे ही परिस्थिती नेहमीचीच असल्याचे अधिकाऱ्यांसाठी ‘वेटींगवर’ थांबलेल्या काही व्यक्तींनी सांगितले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयाला दांडी मारल्यामुळे क्रीडा कार्यालयातील लाखो रुपयांचे साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे रामभरोसेच असल्याचे समोर आले.या क्रीडा संकुलावर तालुक्यापासून ते विभागीय, राज्यस्तरीय खेळ खेळले जातात. यासाठी राज्यभरातून खेळाडू येथे येतात. त्यांच्यासाठी ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना स्वच्छतागृहाची सोय. त्यामुळे येथे येणाऱ्या खेळाडूंचे नेहमीच हाल होतात. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना विकतचे पाणी घेऊन पाजण्याची नामुष्की या कार्यालयावर आली आहे. अनेकवेळा विकतचे पाणी घेऊन खेळाडूंना दिले जात असल्याने खर्च खूप होतो, म्हणून येथील जिल्हा क्रीडा अधिकारी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासही उदासिनता दाखवत असल्याचा आरोप खेळाडूंमधून केला जात आहे. ही स्थिती केवळ गुरूवारीच होती असे नाही तर एऱ्हवी देखील अधिकाऱ्यांची ‘दांडीयात्रा’ सुरूच असते.