अपंगांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 07:05 PM2017-08-01T19:05:25+5:302017-08-01T19:05:34+5:30

प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१)सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली.

The district president of the organization with disability was beaten up by security forces | अपंगांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण

अपंगांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद दि. १ : प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांना मंगळवारी (दि.१)सकाळी १० वाजता घाटी रुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. यामध्ये गाडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या घटनेमुळे घाटीमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले. 

प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे आज जिल्हा परिषदेत आंदोलन होते. त्याविषयी माहिती देण्यासह एका अंपग महिलेस अपंग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत असल्याने मदत करण्यासाठी शिवाजी गाडे हे आज सकाळी १० वाजता घाटीतील बाह्यरुग्ण विभागातील अपंगांचा वार्ड ११७ या ठिकाणी गेले होते. यावेळी सदर महिलेसोबत होते. या ठिकाणी दोन सुरक्षारक्षक तैनात होते. गाडे यांना पाहून दोघा सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकले. तेव्हा गाडे यांनी मी सदर महिलेसोबत आलेलो असल्याचे सांगितले. परंतु ‘तुम्ही या ठिकाणी थांबू शकत नाही’, असे सुरक्षारक्षकांनी म्हटले. यावरुन त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. 

यावेळी सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की करीत गाडे यांच्या पायावर काठी मारली. यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागला.   रक्तस्त्राव सुरु झाला. अशा अवस्थेत शिवाजी गाडे आणि अपंगांनी थेट वैद्यकीय अधीक्षक सुधीर चौधरी यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. याविषयी माहिती पोलिसांनी घाटीत धाव घेतली. यावेळी सुरक्षारक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करीत गाडे आणि इतर अपंगांनी तीव्र संताप व्यक्त केला

Web Title: The district president of the organization with disability was beaten up by security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.