शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत स्थापन होणार ‘वॉर रूम’; आरोग्य समितीचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 15:50 IST

जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

औरंगाबाद : जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सभापती मीनाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत सदस्यांनी जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ची गरज व्यक्त केली.

जिल्ह्यात कुठे साथरोग किंवा आरोग्याचा आणीबाणीसारखा प्रसंग उद्भवलाच, तर वॉर रूमच्या माध्यमातून वैद्यकीय अधिका-यांचे पथक तातडीने तिकडे रवाना करता येईल. वेळीच योग्य तो उपचार करता येईल. आरोग्य सभापती हे वॉर रूमचे अध्यक्ष असतील, तर समिती सदस्य हे वॉर रूमचे सदस्य असतील. त्यानुसार या बैठकीत अशा प्रकारचा वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ग्रामीण भागातील महिलांसाठी दुर्धर आजारावर मोफत उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद, एमजीएम आणि गिब्स फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सामंजस्य करार झाला आहे. या तीनही संस्थांच्या वतीने तालुकास्तरावर रोगनिदान शिबीर घेऊन गंभीर आजारी महिलांवर एमजीएम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यात येणार आहेत, यासंबंधी बैठकीत माहिती देण्यात आली.

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत रुग्ण महिलांचा शोध घेतला जाईल. एमजीएम हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, शस्त्रक्रियाही केल्या जाातील. यासाठी गिब्स फाऊंडेशन ही संस्था आवश्यक निधीचा पुरवठा करणार आहे. यानुसार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये दर महिन्याला एक याप्रमाणे वषार्तून १२ शिबिरे घेण्यात येतील. या बैठकीत सदस्यांनी आरोग्यसेविकांविषयी अनेक तक्रारी केल्या. आरोग्यसेविका ग्रामीण रुग्णांना योग्य वागणूक देत नाहीत. लसीकरणासाठीही त्या वेळेवर जात नाहीत. महिला-बालकांना ताटकळत बसावे लागते. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्यAurangabadऔरंगाबाद