शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १२ हजार बोगस शिधापत्रिकांचे वितरण; तहसील कार्यालयातील दोन लिपिकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:25 IST

१५ हजार शिधापत्रिके पैकी जवळपास १२ हजार शिधापत्रिकांची पैठण तहसील कार्यालयात नोंदच नसल्याचा गंभीर प्रकार त्रीसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीतून समोर आला होता.

ठळक मुद्देतपास आयपीएस अधिकाऱ्याकडेगाव निहाय समितीची स्थापना

पैठण : पैठण तहसील कार्यालयातील  बहूचर्चीत बोगस शिधापत्रिका  वितरण प्रकरणात  पैठण पोलिसांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या तत्कालीन दोन  लिपिकांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संबंधिता विरोधात ऑगस्ट २०१९ मध्ये पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जवळपास १२ हजार बोगस शिधा पत्रिका तहसील कार्यालयात  कुठलीही नोंद न करता परस्पर वितरीत करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. यात महसूलच्या काही बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने याचा तपास आयपीएस अधिकारी गोरख भामरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपासात तहसील कार्यालयातील नोंदी पेक्षा जास्त शिधापत्रिका आढळून आल्या असून या शिधापत्रिका कुणी व कशा वितरीत केल्या आहेत या बाबत पोलीस तपास प्रगतीपथावर असल्याचे उपविभागीय अधिकारी गोरख भामरे यांनी सांगितले. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल असेही भामरे यांनी सांगितले.

या प्रकरणातील पुरवठा विभागातील तत्कालीन लिपिक अब्दुल गफ्फार गाझी, व आर एस जाधव यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. दोघेही सध्या गंगापूर तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. अन्य आरोपी असलेले नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे. या प्रकरणात तत्कालीन दोन तहसीलदार यांच्यावरही चौकशी समितीने ठपका ठेवला असून त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे का या बाबत पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणात कसून चौकशी करण्यात येत असून कुणाचीही गय केली जाणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण : पैठण तहसील कार्यालयातून गायब असलेल्या शिधापत्रिका प्रकरणात २५ ऑगस्ट, २०१९ रोजी, १५ हजार शिधापत्रिका विक्रीचे शुल्क शासन दरबारी जमा न करता अपहार केल्याचा  गुन्हा तत्कालीन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांच्या सह दोन लिपिकावर पैठण पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला होता. जानेवारी २०१५ ते ऑगस्ट २०१५ दरम्यान पैठण तहसील कार्यालयातून वितरित करण्यात आलेल्या १५००० शिधापत्रिकाचे शुल्क ७९०६१ रूपये तत्कालीन पुरवठा नायब तहसीलदार नामदेव देशटवाट, पुरवठा लिपिक अब्दुल गफ्फार गाझी, व आर एस जाधव यांनी जमा न करता अपहार केल्याची फिर्याद नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी दिली होती या फिर्यादीवरून पोलिसांनी तीघावर गुन्हा दाखल केला होता.

तब्बल १२ हजार शिधापत्रिकांची नोंद नाहीपैठण तालुक्यातील नागरिकांना वितरित करण्यासाठी  दिलेल्या १५ हजार शिधापत्रिके पैकी जवळपास १२ हजार शिधापत्रिकांची पैठण तहसील कार्यालयात नोंदच नसल्याचा गंभीर प्रकार त्रीसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीतून समोर आला होता. विशेष म्हणजे गायब झालेल्या  शिधापत्रिका द्वारे स्वस्त धान्य दुकानातून धान्य उचलण्यात येत  असल्याचेही समोर आले होते. या प्रकाराने शासकीय धान्य काळ्याबाजारात जात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, शासकीय समितीने या गंभीर प्रकरणात ठपका ठेवलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर  कुठलीच कारवाई न झाल्याने  आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. बोगस शिधापत्रिका शोधुन काढण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या तहसीलदार यांनी गावनिहाय समिती गठीत केली आहे. 

एकाच कुटुंबात दोन शिधापत्रिका पैठण तालुक्यात एकाच कुटुंबाच्या नावाने दोन दोन शिधापत्रिका वेगवेगळ्या क्रमांकाने वितरित करण्यात आल्या आहेत. वितरित झालेल्या शिधापत्रिका पैकी एकच शिधापत्रिका संबंधित कुटुंबाकडे असून त्याच्या नावाची दुसरी शिधा पत्रिका कुणाकडे आहे याची माहिती सुध्दा त्याच्या कडे नाही. तालुक्यातील ईंदेगाव येथील कल्याण नवथर यांनी त्यांच्या गावातील एकाच कुटुंबातील दोन शिधापत्रिका व त्या आधारे धान्याची केलेली उचल या बाबत तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात पुराव्यासह अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :TahasildarतहसीलदारAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी