शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जगभरातील धर्मांवर आधारित हिंसेमुळे व्यथित - दलाई लामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 06:43 IST

मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा.

औरंगाबाद : मी स्वत:ला भारताच्या तीन हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन अशा तत्त्वज्ञानाचा प्रचारक समजतो. या तत्त्वज्ञानातील दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे करुणा आणि अहिंसा. या दोन्ही गोष्टी आजच्या जागतिक पार्श्वभूमीवर इतिहास उपयुक्त आहेत. परंतु आज जगभरात धर्माच्या नावाखाली हिंसा घडविली जात आहे, याचे मला दु:ख होते, असे जागतिक धर्मगुरू दलाई लामा म्हणाले.जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांचे शुक्रवारी सकाळी औरंगाबाद येथे आगमन झाल्यानंतर शनिवारी सकाळी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.भारताच्या २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन विचारात दिलेल्या शिकवणीनुसार अहिंसा आणि करुणा याला महत्त्व दिल्यामुळे मानव मानवातील द्वेषाला इथे थारा नाही. परंतु सध्या जगभरात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात हिंसा घडविली जात आहे. याबाबतची दृश्ये टीव्हीवर पाहताना मला अतिव दु:ख होते, असे सांगून दलाई लामा म्हणाले की, धर्माच्या नावाखाली प्रामुख्याने ख्रिश्चन, इस्लाम यांना त्रास दिला जातो. माझ्या दृष्टीने व्यथित करणारी बाब म्हणजे बर्मामध्ये बौद्धांकडून मुस्लिमांना तर इस्रायलमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांना तर इजिप्तमध्ये शिया-सुन्नीवरून धार्मिक हिंसा घडविली जात आहे. मोहम्मद पैगंबरांनी सहाशे वर्षांपूर्वी करुणा आणि शांततेची शिकवण दिली. आजही तेच मोहम्मद आहेत. त्यांची तीच करुणा आहे आणि तीच पाच वेळा केली जाणारी प्रार्थना आहे. तरीही ही हिंसा का, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी ज्या-ज्या देशांत जातो तेथे करुणा आणि अहिंसेचे महत्त्व सांगत असतो.कारण कोणताही धर्म माणसाला मारण्याची परवानगी देत नाही. या पार्श्वभूमीवरभारतातील २६०० वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची आठवण होते. या संस्कृतीचा प्रचार करण्याची गरज आहे. मी स्वत:ला भारतीय मानतो. कारण मी गेल्या साठ वर्षांपासून या देशात राहतो.मला एका फ्रेंच पत्रकाराने विचारले असता मी त्यांना सांगितले होते, माझे मस्तिष्क भारतातील नालंदा विश्वविद्यालयाच्या तत्त्वज्ञानाने भरलेले आहे, तर माझे भरण-पोषण या देशातील डाळ, चपातीने केले आहे. मी भारताचा पुत्र आहे (आय अ‍ॅम सन आॅफ इंडिया), असेही दलाई लामा म्हणाले.केवळ प्रार्थनेतून माणूस घडणार नाहीआधुनिक शिक्षणातून भौतिकवादी माणूस घडवला जातो आहे. त्यांच्यामध्ये करुणा आणि अहिंसेचा अभाव दिसून येतो. भारतीय समाजाचेही तसेच झाले आहे. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन करुणा आणि अहिंसा मानवतावाद यावरील भारतीय प्राचीन तत्त्वज्ञानातील शिक्षण देण्याची गरज आहे. केवळ धर्माच्या प्रार्थनेतून माणूस घडणार नाही. माणसाला धर्मातील मानवी कल्याणाची मूल्ये अंगीकारावी लागतील. केवळ ‘बुद्धम शरणम् गच्छामि’ म्हणून हे मूल्य प्रत्यक्षात येणार नाही.- दलाई लामा

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबाद