शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका प्रशासक अन् एमआयएमच्या माजी नगरसेवकांत खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 17:43 IST

प्रशासन नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही, त्यामुळे विरोधात जनआंदोलन करण्याची घोषणा एमआयएमने केली.

औरंगाबाद : महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात काही दिवसांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे. प्रशासक आणि एमआयएमच्या माजी नगरसेवकांमध्ये सोमवारी संध्याकाळी जोरदार खडाजंगी झाली. चौधरी यांच्याकडून मागील काही दिवसांपासून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असून, विकासकामे ठप्प झाली आहेत. प्रशासन नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही. त्यामुळे विरोधात जनआंदोलन करण्याची घोषणा एमआयएमने केली.

२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तत्कालीन प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी प्रत्येक वॉर्डात १ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येतील, अशी घोषणा केली. त्यांच्या बदलीनंतर डॉ. चौधरी यांनी विकासकामांना ब्रेक लावला. १ कोटींची कामे ६० लाखांवर आणली. ही कामेही होत नाहीत. रखडलेल्या विकासकामांसंदर्भात सोमवारी सायंकाळी एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक प्रशासकांच्या भेटीला महापालिकेत पोहोचले. त्यांना बराच वेळ थांबविण्यात आले. त्यानंतर सर्वांना कक्षात प्रवेश देण्यात आला. खुर्च्या ओढून बसताना माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी यांच्याकडून एक खुर्ची पडली. त्यावर चौधरी रागाच्या भरात ‘ही कोणती पद्धत,’ असे म्हणाले. सिद्दिकी व चौधरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अपमानामुळे सिद्दिकी कक्षातून बाहेर निघून गेले. थोड्या वेळाने अन्य नगरसेवकांनी त्यांना समजूत घालून परत आणले. दहा मिनिटे विकासकामांवर चर्चा झाली. कपात केलेला निधीही नंतर देण्याचे आश्वासन डॉ. चौधरी यांनी दिले.

अपमानाची तिसरी वेळपहिल्यांदा जेव्हा एमआयएमचे नगरसेवक प्रशासकांना भेटायला गेले, तेव्हा डॉ. चौधरी यांनी ‘तुम्ही माजी नगरसेवक आहात,’ म्हणून डिवचले. ‘विकास निधीवर तुमचा हक्क नाही, आम्ही आमच्या हिशेबाने काम करू,’ असे सुनावले. दुसऱ्यांदा भेटायला गेले तेव्हा शिष्टमंडळाला तासभर बाहेर उभे केले. कक्षात गेल्यावर, ‘मी घरचे काम करीत नव्हतो,’ असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. माजी नगरसेवकांनीही, ‘आम्हीसुद्धा आमचे घरचे काम घेऊन आलो नाही,’ अशा शब्दात सुनावले.

आम्ही रस्त्यावर उतरणारबुढीलेन, औरंगपुरा, चंपाचौक येथील रस्ते, ड्रेनेज आदी प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही प्रशासकांकडे पाठपुरावा करतोय. ते अजिबात सहकार्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.- नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक, एमआयएम

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका