शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

नगर, नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याच्या ‘जलसंपत्ती नियमन’च्या निर्देशाची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:51 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्दे - ‘जायकवाडी’चे हक्काचे पाणी अडवले - पाण्याच्या विसर्गात खंड, हक्काचे पाणी पोहोचलेच नाही

औरंगाबाद : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्यक्षात निर्देश आणि आदेशानुसार पाणी सोडण्याऐवजी वरच्या भागांत जायकवाडीचे पाणी अडविण्यात आले, बंधारे भरण्यात आले आणि पाण्याच्या विसर्गात खंड पाडला. या प्रकाराची जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पावर जलसंकट निर्माण झाले. जायकवाडीच्या वरची नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणांतून जायकवाडीसाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडण्याची मागणी झाली. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ऊर्ध्व भागातील धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिले; परंतु नगर, नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विविध माध्यमांतून विरोध झाला. १५ दिवसांच्या विविध घडामोडी आणि संघर्षानंतर वरच्या धरणांतून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. जायकवाडीसाठी १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणांतून जायकवाडी धरणासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग बंद झालेला आहे. यात निळवंडे धरणातून  नियोजित पाणी सोडण्यापूर्वीच विसर्ग बंद करण्यात आला आहे. जायकवाडीच्या हक्काचे हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील रबी हंगामासाठी देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे (रोटेशन) अडवण्यात आले आहे.  ८.९९ पैकी जायकवाडीच्या वाट्याला किमान ६ टीएमसी पाणी येणार होते; परंतु केवळ ३.८० टीएमसी पाणी आले. २.२० टीएमसी पाण्याची तूट आहे. कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे या कारणांबरोबर पाण्याची थेट चोरी करण्यात आल्याने हक्काचे पाणी जायकवाडीत पोहोचले नाही. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

संनियंत्रण यंत्रणा कागदावरचजायकवाडीत ज्या-ज्या धरणांतून पाणी सोडले जाणार आहे, तेथे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नोंद ठेवण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. जायकवाडीत प्रत्यक्षात आलेल्या पाण्याचे प्रमाण पाहता ही यंत्रणा केवळ कागदावरच कार्यरत होती, अशी ओरड होत आहे. 

दखल घ्यावीजायकवाडीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सातत्य ठेवले पाहिजे होते; परंतु विसर्ग मध्येच थांबतो. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी होती. या सगळ्या संदर्भात प्राधिकरणाने दखल घेतली पाहिजे. - प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

न्यायालयात दाद मागणारन्यायालयाच्या आदेशानंतरही जायकवाडीसाठी वरच्या धरणांतून ठरल्याप्रमाणे पाणी मिळालेले नाही. जायकवाडीत किमान ६.३ टीएमसी पाणी येणे अपेक्षित होते; परंतु नगर, नाशिक जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावापुढे सरकार झुकले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागितली जाईल, असे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार