शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फायजर कर्मचाऱ्यांचे वनटाईम सेटलमेंट करण्याची चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 20:03 IST

वनटाईम सेटलमेंटची चर्चा उद्योग वर्तुळात आहे, पण किती रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्देबेरोजगारीचे संकट अद्याप कंपनीकडून निर्णयाची घोषणा नाही 

औरंगाबाद : वाळूज गट नं. ३८ येथील फायजर हेल्थ केअर या औषधनिर्माण कंपनीचा प्रकल्प अचानक बंद करण्यात आल्यामुळे ७०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कंपनी व्यवस्थापनाने जाहीरपणे कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र कंपनी कर्मचाऱ्यांचा हिशेब वनटाईम सेटलमेंट करून चुकता करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग वर्तुळातून पुढे येत आहे. 

फायजर कर्मचाऱ्यांना भारतातील इतर प्रकल्पांत सामावून घेणार नाही. त्यांना आर्थिक सहाय्य करणार असल्याचा निर्णय फायजरच्या व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. तोटा होत असल्याचे कारण देऊन फायजरने निर्यातक्षम उत्पादन करणारा वाळूज येथील प्रकल्प ७ रोजी बंद करण्याचा निर्णय घेऊन उद्योगविश्वाला मोठा हादरा दिला. कायदेशीररीत्या कोणतेही सोपस्कार कंपनीने पूर्ण केले की नाही, याबाबत कुठलीही माहिती न देता कंपनीने गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. २०१९ या वर्षात कंपनीने चेन्नई आणि औरंगाबाद येथील दोन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्या. त्या कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित ७०० कर्मचारी एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. 

फायजर जे वेतन त्या कर्मचाऱ्यांना देत आहे, त्या तुलनेत इतर कंपन्यांत वेतन मिळणेही अवघड आहे. कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ७०० जणांचे काय करणार, याची माहिती फायजर व्यवस्थापनाने दिली नव्हती. 

सर्व काही गुलदस्त्यात वाळूजमधील गट नं. ३८ येथील अमेरिकन कंपनी फायजर हेल्थ केअरचा (हॉस्पिरा) प्रकल्प मंगळवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे उद्योग वर्तुळासह औरंगाबादच्या अर्थकारणाला वार्षिक १२५ कोटींहून अधिक फटका बसला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि फायजरवर आधारित असलेल्या छोट्या कंपन्यांना मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. ४कर्मचाऱ्यांना इतर प्रकल्पांत सामावून घेणार काय, याचे उत्तर कंपनी देण्यास तयार नाही. भविष्यात जे काही निर्णय कंपनी घेईल, ते समोर येतील असे चित्र सध्या आहे. वनटाईम सेटलमेंटची चर्चा उद्योग वर्तुळात आहे, पण किती रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEmployeeकर्मचारीbusinessव्यवसाय