प्रतिक्रीया१. संधी दिल्याबद्दल धन्यवाद
कॅम्पस क्लबतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा, विविध उपक्रम यांचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी कॅम्पस क्लबतर्फे प्रयत्न केले जातात. आमच्या विद्यार्थ्यांना अशा दर्जेदार उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
----
२. व्यासपीठ निर्माण केले
कलागुण दाखविण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्तही एक व्यासपीठ हवे असते. हे व्यासपीठ निर्माण करण्याचे काम कॅम्पस क्लबने केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी कॅम्पस क्लबची नेहमीच मदत होते.
-------
३. मुलांना ठेवले ॲक्टिव्ह
सध्या कोरोनामुळे सगळे जग ठप्प झाले आहे; परंतु कॅम्पस क्लबने मात्र सातत्याने ऑनलाईन पद्धतीने विविध उपक्रम राबविले आणि मुलांचे कायम मनोरंजन केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळातही ॲक्टिव्ह ठेवले हे कौतुकास्पद आहे.
-----
४. विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
अनेकदा खूप इच्छा असूनही पालकांना मुलांसाठी काही करता येत नाही किंवा शिक्षकांनाही मुलांच्या छंदांना प्रोत्साहन देणे जमत नाही. ही कमतरता बरोबर भरून काढण्याचे काम कॅम्पस क्ल्बद्वारे केले जाते. कॅम्पस क्लबचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असतो.
========