शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

खांदेपालटनंतर पोलीस दलात नाराजीचा सुर, सातपैकी दोन वरिष्ठ निरीक्षकांचा पदभार घेण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:11 IST

पोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

छत्रपती संभाजीनगर :पोलिस आयुक्तांनी कालच सहायक पोलिस आयुक्तांना पदस्थापना देण्यासह सात पोलिस निरीक्षकांची खांदेपालट केली होती. पाच निरीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होत पदभार स्वीकारला तर दोन वरिष्ठ निरीक्षकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडी होत असताना ३७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी मंगळवारी सायंकाळी काढले.

आयुक्तालयातील अनेक कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असल्यामुळे त्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्तांनी मंगळवारी रात्री काढले. यात १४ ग्रेड पोलिस उपनिरीक्षक, ११० हवालदार, ६१ पोलिस अंमलदार आणि १९१ पोलिस नाईक अशा ३७६ जणांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा काढलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमधील गुन्हे शाखेत संदीप गुरमे, एमआयडीसी वाळूजमध्ये अविनाश आघाव, वाळूजमध्ये पदभार गिता बागवडे, वाळूज वाहतूक विभागात सचिन इंगोले तर सिटीचौक ठाण्यात विठ्ठल पोटे रुजू झाले. वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी उस्मानपुरा आणि दिलीप गांगुर्डे यांनी बेगमपुरा ठाण्याचा पदभार स्वीकारला नाही. निरीक्षक गिरी यांनी सिडको, सिटीचौक आदी ठाणे सांभाळले आहेत. एपीआय दर्जाच्या उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्यांची बदली झाल्यामुळे ते नाराज असल्याचे समजते. बेगमपुऱ्यात बदली झालेले दिलीप गांगुर्डे आजारी रजेवर गेले आहेत. त्यांची चार महिन्यांपूर्वी पुंडलिकनगरातून वाळूज वाहतूक शाखेत बदली झाली होती. ते मॅटमध्येही बदलीला आव्हान देणार असल्याची चर्चा पोलिस विभागात आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार अविनाश आघाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलिस विभागात नाराजीचा सूरपोलिस निरीक्षकांच्या झालेल्या बदल्यांमुळे काही अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. चार महिन्यात गांगुर्डे यांची बदली केली जाते. दुय्यम दर्जाचे पोलिस ठाणे वरिष्ठ निरीक्षकांना देण्यात येते. त्याचवेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने आरोप केलेल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यास थेट गुन्हे शाखा मिळते. काही अधिकाऱ्यांना पाहिजे ते कर्मचारी, अधिकारी सोबतीला मिळतात. याविषयी जोरदार चर्चा पोलिस विभागात करण्यात येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादTransferबदली