शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा

By सुमित डोळे | Updated: July 12, 2023 20:23 IST

अध्यक्ष अंबादास मानकापेंसह संचालक मंडळ, कर्जदारांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : नियमबाह्य कर्जवाटप करून ओळखीतल्याच लोकांना, स्वत:च्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचा आदर्श नागरी सहकारी संस्थेमध्ये तब्बल २ अब्ज दोन कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०१६ ते २०२३ यादरम्यान झालेल्या उपनिबंधक कार्यालयाच्या लेखा परीक्षणात हा प्रकार सिद्ध झाला. सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसलेल्या ठेवीदारांनी त्यानंतर सायंकाळी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

एप्रिल २०२३ मध्ये स्थापन झालेल्या आदर्श ग्रुप अंतर्गत आदर्श नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. सहा महिन्यांपासून या पतसंस्थेतील गैरव्यवहारांविषयी चर्चा सुरू होत्या. अनेक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून विशेष लेखा परीक्षक धनंजय चव्हाण यांनी २०१६ ते २०१९ कालावधीतले लेखा परीक्षण केले. जून २०२३ मध्ये त्यांनी याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यामध्ये मानकापे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक कारनामे समोर आले. कर्जासाठी आलेल्या अर्जांची योग्य छाननी करणे, निकषानुसार पात्र-अपात्र ठरवून संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत विचार करून मंजुरीअंती कर्ज वितरण करणे बंधनकारक होते. मात्र आरोपींनी यातील एकही निकष न पाळता तब्बल २०२ कोटी रुपयांचा कर्जवाटपात गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले.

यांच्यावर गुन्हे दाखलदोन्ही गुन्हे मिळून अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे (एन-६), महेंद्र जगदीश देशमुख (महाजन कॉलनी), अशोक नारायण काकडे, काकासाहेब लिंबाजी काकडे (दोघेही वरझडी), भाऊसाहेब मल्हार मोगल (निलजगाव), त्र्यंबक शेषराव पठाडे (वरझडी), रामसिंग मानसिंग जाधव (गिरनेर तांडा), गणेश ताराचंद दौलतपुरे (चेतनानगर ), ललिता रमेश मून (एकोड पाचोड), सपना निर्मळ संजय (एन-३), प्रेमिला माणिकलाल जैस्वाल (आपतगाव), मुख्य व्यवस्थापक देवीदास सखाराम अधाने (रा. नवजीवन कॉलनी), पंडित बाजीराव कपटे (हडको) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद