शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निराशाजनक ! मराठवाड्याच्या रेल्वेसाठी अवघा १.४५ टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:37 IST

पीटलाईन, दौलताबाद - चाळीसगाव, जालना - खामगाव, रोटेगाव - कोपरगाव मार्गाकडे दुर्लक्षच

ठळक मुद्देआंध्र प्रदेश, तेलंगणाच्या विकासावरच भर औरंगाबादच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेला अर्थसंकल्पातून प्राप्त झालेल्या निधीपैकी मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी केवळ १.४५ टक्के निधी खर्च होणार आहे. उर्वरित निधी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात दुहेरीकरण, तिहेरीकरण, विद्युतीकरणासह नव्या रेल्वेमार्गांसाठी खर्च होणार असल्याने रेल्वे संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.

अर्थसंकल्पात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या मनमाड - परभणी मार्गाचे दुहेरीकरण, औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्ग, रोटेगाव - कोपरगाव मार्ग, जालना - खामगाव मार्ग, पूर्णा येथे लोकोशेड, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड येथे बायपास लाईन, औरंगाबादेत पीटलाईन या मागण्यांचा विचारच केला नाही. दक्षिण मध्य रेल्वेला मिळालेल्या एकूण निधीपैकी फक्त १.४५ टक्के निधी मराठवाड्यात यावर्षी खर्च होणार असल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले. संपूर्ण झोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या औरंगाबादच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मनमाड - मुदखेड - ढोणे मार्ग विद्युतीकरणासाठी १७५ कोटीमनमाड - मुदखेड - ढोणे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ७८३ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २०१५-१६ मध्येच मंजुरी मिळाली आहे. ८६५ कोटी रुपयांच्या निधीतून या मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. पूर्णा - अकोला मार्गाच्या विद्युतीकरणासाठी ८५ कोटी मंजूर झाले आहेत.

सर्वेक्षणातच रेल्वेमार्गऔरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बाेर्डाने गुंडाळला आहे. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी विचारलेल्या माहिती अधिकारातूनही ही बाब समोर आली आहे. रोटेगाव - कोपरगाव हा प्रस्तावित मार्गही अद्याप सर्वेक्षणात आहे. जालना - खामगाव मार्गाच्या सर्वेक्षणासाठी निविदाप्रक्रिया सुरू आहे. सोलापूर - तुळजापूर - जालना हा मार्गही गुंडाळण्यात आला आहे, अशी माहिती ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेbudget 2021बजेट 2021