शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल अरेस्टचा फास; माजी अतिरिक्त उद्योग संचालक ३० लाखांना फसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:01 IST

भयंकर प्रकार : कुटुंबापासून दूर नेण्यासाठी हॉटेलात थांबायला भाग पाडले

छत्रपती संभाजीनगर : दहशतवाद, अंमली पदार्थांच्या तस्करीत बँक खात्यांना तुमच्या आधार कार्डचा वापर झाला आहे, असे सांगत सेवानिवृत्त उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३० लाख ४० हजारांचा गंडा घातला. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

विश्वनाथ राजाळे (६१, रा. एन. ७) २०२०मध्ये अतिरीक्त उद्योग संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कुरिअर कंपनीच्या नावे काॅल आला. मोबाइलवर सीबीआयच्या बनावट लोगोची कागदपत्रे पाठवली. तोतया अधिकाऱ्यांनी संपर्क करून राजाळे यांच्या तीन बँक खात्यांचा अंमली पदार्थ, दहशतवादासाठी वापर झाला आहे. याचा तपास करण्यासाठी त्यांनी राजाळेंना स्काईपद्वारे व्हिडीओ कॉल सुरू केले. कॉलवरील व्यक्तीने नरेश गुप्ता बॅनर्जी नाव सांगून पोलिसाचे ओळखपत्र पाठवले. बलसिंग राजपूतने पोलिस उपायुक्त म्हणून कॉल करून त्याने एका नेत्याला अटक केल्याचे छायाचित्र पाठवले. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात राजाळे संमोहित होऊन घाबरून गेले होते.

आठ क्रमांकावरून संपर्क, अधिकाऱ्यासारखे दालनसायबर गुन्हेगारांनी राजाळे यांना विविध ८ क्रमांकांवरून काॅल केले. व्हिडीओ कॉलमध्ये पोलिसांसारखे दालन, पोलिसांचे चिन्ह वापरण्यात आले. बँक व्यवहाराची तपासणी करण्याचे कारण खात्यातील रक्कम एका पोर्टलवर वळवण्याची सूचना करून ३० मिनिटांत परत करण्याचे आश्वासनही दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवत राजाळे यांनी ईव्हलँड कॉमेस्टीबल प्रा. लि. नावाच्या एसबीआय बँक खात्यावर ३० लाख ४० हजार रुपये वळते केले. हे खाते गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील नानपुराचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कुटुंबापासून दूर नेलेराजाळे कुटुंबाला हा प्रकार सांगतील, या शक्यतेने गुन्हेगारांनी त्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यासाठी धमकावले. घर व हॉटेल मिळून राजाळे तब्बल सहा दिवस डिजिटल अरेस्टमध्ये राहिले. सहाव्या दिवशी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.

वकिलाची उच्च शिक्षित मुलगी फसलीडिजिटल अरेस्टमध्ये सेवानिवृत्त अधिकारी, वृध्दांसह तरुणींना लक्ष करण्यात येत आहे. शहरातील एका वकिलाच्या उच्च शिक्षित मुलीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल १८ तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. बदनामीपोटी अनेकजण तक्रार करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर