शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज दंगलीचा डीएमआयसीवर झालेला परिणाम सांगणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 11:40 IST

शहरातील क्षमता आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आॅरिकचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

औरंगाबाद : आॅगस्ट महिन्यात मराठा क्रांती मोर्चादरम्यान वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या दंगलीचा परिणाम डीएमआयसी आणि आॅरिक सिटीमधील गुंतवणुकीवर किती प्रमाणात झाला हे सांगणे अवघड आहे. परंतु सकारात्मक दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून या शहरातील क्षमता आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आॅरिकचे सरव्यवस्थापक गजानन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पाटील म्हणाले, डीएमआयसी, आॅरिकवर वाळूजमधील दंगलीचा थेट परिणाम कसा आणि किती झाला हे सांगता येणार नाही. मात्र कुठल्याही शहरात दंगलीसारखी घटना घडली की, त्याची माहिती आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल मीडियामुळे जाते. उद्योजक गुंतवणुकीबाबत फार संवेदनशील असतात. आम्ही मार्केटिंगचे काम करीत असल्यामुळे ते जाणवत आहे. गुंतवणूकदार येताना सरकारी धोरण, कामगार, तांत्रिक कामगार, दळणवळण, उत्पादनावर स्थानिक दंगलीचा होणारा परिणाम, याचा विचार उद्योजक करतात, त्यामुळे परिणाम होतातच. 

आज विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी पाटील यांच्यासोबत शेंद्रा-बिडकीनची पाहणी केली. स्थानिक वातावरण उद्योजकांसाठी पोषक असावे, यासाठी ते एका सेलची स्थापना करीत आहेत. पोलीस, जिल्हा प्रशासनाचा सेल असेल. त्याचा नियमित आढावा घेण्यात येईल. वाळूजमधील दंगलीच्या घटनेचा परिणाम होणार नाही, याची माहिती सकारात्मकरीत्या माहिती प्रदर्शन, परिषदांमध्ये एमआयडीसी मांडत आहे. 

सहा ते सात नवीन कंपन्यांशी चर्चाह्योसंगने १०० पैकी २५ एकर जागेत काम सुरू केले आहे. शिवाय आणखी काही रशियन आणि जपानी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये स्पेशालाईज स्टील, फार्मास्युटिकल्स कंपन्यांचा समावेश आहे. बिडकीनचे अजून मार्केटिंग सुरू केलेले नाही. सध्या ३५ टक्के काम पूर्ण होत आले आहे. संरक्षण खात्यातील काही उद्योगांशी संपर्क सुरू असून, रोजगाराभिमुख गुंतवणूकदार यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आयटी कंपन्यांसाठी डीसी रूल शिथिलआयटी कंपन्यांसाठी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल शिथिल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांना जागा आणि ग्राहक उपलब्ध होतील, याबाबत आॅरिकने आश्वासन दिले आहे. अ‍ॅमेझॉन, एअरटेल, एचपी, मंत्रा डाटा सेंटरसाठी जागा पाहत आहे. दोन डाटा सेंटर येथे येतील. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. तसेच आॅईल डेपो जागा आरक्षित केली आहे.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरAurangabadऔरंगाबाद