नंदा अरविंद कदम यांची ३६ हजाराच्या ऐवजासह बॅग सिडको बसस्थानक ते गजानन कॉलनी प्रवासात रिक्षात विसरली. दागिने आणि पैश्याच्या बॅगसह पसार झालेल्या रिक्षाचालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी एसपीओच्या मदतीने बदनापूरात पकडले आणि प्रवासी महिलेला तिची बॅग परत मिळवून दिली. सपोनि घनशाम सोनवणे , पोलीस कर्मचारी प्रवीण मुळे, दीपक जाधव, शिवाजी गायकवाड, एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, विजय गांगे व चेतन हिवराळे यांनी याकरिता पुढाकार घेतला.
दुसऱ्या घटनेत रोहिलागल्ली येथील १० ते १५ महिला बुधवारी रात्री ७ वाजता लोटाकारंजा येथे लग्न आटोपून दोन रिक्षाने घरी आल्या होत्या. लग्नातील नवरीचे दागिने आणि दहा ते पंधरा महिलांचे मोबाईल जमा करून ठेवलेली अन्य बॅग असे सुमारे २ लाखांचा ऐवजाची मोठी बॅग रिक्षात विसरली. याविषयी नगमा यांनी सिटीचौक पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व नाकाबंदीवरील अंमलदार यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून संशयित रिक्षा (एम एच २० बीटी ८९४६) शोधून काढली. तेव्हा रिक्षात बॅग असल्याचे चालकालाही माहिती नव्हते. तो रिक्षा उभी करून घरात आराम करीत होता. बॅग रिक्षात जशीच्या तशी होती.