शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
2
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
3
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
4
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
5
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
7
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
8
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
9
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
10
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
11
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
12
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
13
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
14
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
15
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
16
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
17
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
18
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
19
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
20
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा

धुळ्यातील शाळेचा चपराशीच मराठवाड्यातील 'नशे'चा पुरवठादार, १८ हजार बाटल्या जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:07 IST

नशेसाठीची एक बाटलीची किंमत १७५ रुपये, शिपायाला मिळायची ५५ रुपयांत, नशेखोरांना ३५० रुपयांत विक्री

छत्रपती संभाजीनगर : धुळ्यातील शाळेत चपराशी असलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. पद्मनाभनगर, धुळे) हा मध्यप्रदेश व गुजरातहून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांची तस्करी करून संपूर्ण मराठवाड्यात पुरवठा करत होता. ही बाब उघडकीस येताच गुन्हे शाखेच्या ४ पथकांनी मध्यप्रदेश, गुजरात गाठत दुर्गेश सीताराम रावत (५४, रा. इंदूर) व धर्मेंद्र ऊर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (३२, रा. अहमदाबाद) या दोन एजन्सीचालकांना अटक केली. त्यांच्याकडे अवैधरीत्या साठवून ठेवलेला १८ हजार ३६० बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, १७५ रुपये मूळ किंमत असलेली एक बाटली अग्रवालला ५५ रुपयांत मिळत होती. नशेखोरांना ३५० रुपयांपर्यंत विक्री केली जात.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मूळ पेडलर्सचे सिंडिकेटच मोडून काढण्यासाठी नियोजन केले. एएनसी, गुन्हे शाखेसह विशेष पथक यासाठी सातत्याने कारवाई करत आहेत. त्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक रवीकांत गच्चे, विनायक शेळके यांच्या पथकांनी अग्रवालसह सय्यद नबी सय्यद लाल (३३, रा. वाळूज) यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कारमधून १०० गोळ्यांचे लपवलेले पाकीट जप्त केले. अग्रवालचे सय्यद नबी सय्यद लाल व ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माउली (रा. जयभवानीनगर) यांच्यासोबतचे ८ वर्षांपासूनचे अमली पदार्थांचे हे मोठे रॅकेट गुन्हे शाखेने अखेर मोडून काढले आहे.

चार पथके, दोन दिवसांत १८ हजारांचा साठा जप्तअग्रवाल रावत व प्रजापतीकडून औषधांचा साठा मागवत असल्याचे निष्पन्न झाले. बँक खात्याद्वारे त्यांच्यात ४ महिन्यांत लाखोंचे व्यवहार झाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून निरीक्षक संभाजी पवार यांनी ४ पथके तयार केली. २ दिवसांत पथकांनी इंदूर व अहमदाबाद गाठत रावत, प्रजापतीच्या गोडावूनमध्ये छापे टाकत तब्बल १८ हजार ३६० बेहिशेबी बाटल्यांचा साठा उघड केला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

तब्बल १५ हजारांच्या गोळ्यांची ऑर्डरअग्रवाल २०१७ पासून या रॅकेटमध्ये सक्रिय आहे. २०१८ मध्ये नबी व त्याला अटक झाली हाेती. औषधांची ऑर्डर करण्यासाठी त्याने सुरतच्या मित्राच्या नावे बनावट औषध परवाना तयार करून धुळ्यात ट्रॅव्हल्स, कुरिअरमार्गे मागवला होता. त्याची खात्री न करताच प्रजापती, रावत औषधांचा पुरवठा करत होते. गेल्या ५ महिन्यांत अग्रवालने त्यांच्याकडून तब्बल १२ ते १५ हजारांच्या गोळ्यांची ऑर्डर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. शिवाय, सात दिवसाला तो शहरात ८०० बाटल्यांचा पुरवठा करत होता.

यांनी केली कारवाईपोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक रवीकांत गच्चे, विनायक शेळके, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, सहायक फौजदार दिलीप मोदी, अंमलदार प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, सागर पांढरे यांनी ही कारवाई पार पाडली.

English
हिंदी सारांश
Web Title : School Peon: Drug Supplier; Over 18,000 Bottles Seized.

Web Summary : A school peon in Dhule supplied drugs across Marathwada via Gujarat and Madhya Pradesh. Police seized over 18,000 bottles and arrested suppliers from Indore and Ahmedabad. He sold the drugs for huge profit.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ