शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाज उतरला रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:33 IST

अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी जगन्नाथ रिठे, लक्ष्मण काळे, मंजित कोळेकर, कैलास रिठे, शिवाजी वैद्य, डॉ. संदीप घुगरे यांची यावेळी भाषणे झाली. संजय कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बनसोडे यांनी आभार मानले. रामेश्वर कोरडे, अमोल परभाळे, विष्णू रिठे, कृष्णा बनसोडे, विनोद रिठे, राजू कोरडे, सुनील रिठे, निवृत्ती रिठे, आकाश रिठे, अजय रिठे, अजय ढोरमारे, अशोक काकडे आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.पैठण रोडवरील कांचनवाडी- नक्षत्रवाडी येथे जनार्दन कांबळे व अ‍ॅड. संदीपान नरवटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरुण रोडगे यांच्या नेतृत्वाखाली तर पडेगाव येथे नगरसेवक रावसाहेब आम्ले, रमेश निचित, आदिनाथ पल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. हर्सूल येथे रंगनाथ राठोड, पूनम बमणे, सीताराम सुरे व दादाराव सावळे आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं.... नाही कुणाच्या बापाचं, धनगर आणि धनगड आहे एकच, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या.

टॅग्स :reservationआरक्षणagitationआंदोलन