शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवयानी डोणगावकर यांची याचिका खारीज; मीना शेळके यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 13:43 IST

४ जानेवारी २०२० रोजी मतदान झाले. त्यात शेळके व डोणगावकर यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली असता, शेळके यांचे नाव निघाले.

ठळक मुद्देखंडपीठाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेपास नकार दिला

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षपदी निवडीसंदर्भात माजी अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी दाखल केलेला विशेष अनुमती अर्ज (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयाने खारीज केला. त्यामुळे शेळके यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद अबाधित राहिले आहे.

मीना शेळके यांच्या अध्यक्षपदावर पीठासन अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या निर्णयात हस्तक्षेपास नकार दिला होता. खंडपीठाच्या या निकालात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेपास नकार दिला. त्यामुळे डोणगावकर यांचा विशेष अनुमत अर्ज (एसएलपी) खारीज झाला.

काय होते प्रकरण...औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ३ जानेवारी २० रोजी मतदान झाले होते. जि. प. सदस्या मोनाली राठोड यांचे मत चुकीच्या पध्दतीने नोंदवल्याचा आक्षेप घेण्यात आला व त्यावरून सभागृहात गोंधळ झाल्यामुळे पीठासन अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्‌यावरून निवडणूक तहकूब केली व दुसऱ्या दिवशी निवडणूक घेतली. डोणगावकर यांनी ३ तारखेची निवडणुकीची सभा तहकूब करण्याच्या निर्णयाविरुध्द औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने, अध्यक्ष निवडीचा निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल असे म्हणत तहकूब सभेस मुभा दिली होती. त्यामुळे ४ जानेवारी २०२० रोजी मतदान झाले. त्यात शेळके व डोणगावकर यांना समान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली असता, शेळके यांचे नाव निघाले. त्याआधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी शेळके निवडून आल्याचे जाहीर केले होते. सर्वोच्च न्यायालयात मीना शेळके यांच्यावतीने अ‍ॅड. दिलीप तौर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद