शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस शतरंजचे बेताज बादशाह; विधान परिषदेला वेगळा डाव टाकणार: रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:49 IST

राज्यसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळाचे डाव टाकून विजय खेचून आणला.

औरंगाबाद: विधान परिषदेला आमचे सगळे उमेदवार निवडून आणणार, या खेळात माजी मुख्यमंत्री शतरंजचे बेताज बादशाह असून यावेळी वेगळ्या मार्गाने डाव टाकून आम्ही विजय मिळवणार, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज केला. कोणा एकाला नाही तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला भाजप हरवणार असेही केंद्रीयमंत्री खा. दानवे यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्री दानवे पुढे म्हणाले, एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही तर भाजप ही निवडणूक बिनविरोध करेल अशी पक्षाची रणनीती नव्हती. केवळ एका नावाला नाही, आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या विरोधात लढत आहोत. राज्यसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिबळाचे डाव टाकून विजय खेचून आणला. यावेळी दुसरा डाव टाकून विधानपरिषदेचे सर्व उमेदवार निवडून आणणार. हा निकाल धक्कादायक असेल हे मात्र नक्की, असा दावाही केंद्रीयमंत्री दानवे यांनी केला. 

पंकजा मुंडे कोणाचेही ऐकणार नाहीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांनी भाजपला सोडून द्यावे, वेगळा पक्ष काढावा आम्ही पाठीशी उभा राहू असे वक्तव्य केले आहे. यावर दानवे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात दुसऱ्यांमध्ये खोडा घालता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. पंकजा मुंडे अशा कोणाचेही ऐकून निर्णय नाहीत घेणार. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष त्यांना योग्य ते ठिकाणी, योग्यवेळी चांगली जबादारी असेही केंद्रीयमंत्री दानवे म्हणाले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादVidhan Parishadविधान परिषद