शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'फडणवीस साहेब, भुजबळांना पाठबळ देऊ नका'; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

By राम शिनगारे | Updated: December 13, 2023 18:53 IST

बीडच्या दंगली भुजबळांनीच घडविल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाज न्याय्य हक्कासाठी लढा देत आहे. त्यात राज्यातील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ खोडा घालत असून, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळत आहे. त्यांच्या दबावामुळेच ६ कोटी मराठा समाजावर अन्याय सुरू आहे. त्यामुळे फडणवीस साहेब भुजबळांना पाठबळ देऊ नका, अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे आवाहन मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.

विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण, ओबीसी, बीड जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटनांवर भाष्य केले. त्यास मनोज जरांगे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. महाराष्ट्र अशांत करण्याचा भुजबळांचा डाव आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ते करीत आहेत. त्या बदल्यात भुजबळांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस मागे घेण्यास भाग पाडत आहेत. बीडमधील त्यांच्या पाहुण्याचे हॉटेल जाळले. यामागेही भुजबळ यांचाच हात असल्याचा अंदाज आता येऊ लागला आहे. त्यांना सर्वच प्रकारची इत्यंभूत माहिती असल्यामुळे त्यांनी बीड जिल्ह्यात दंगली घडविल्या असाव्यात, असेही त्यांनी सांगितले. शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. या मुदतीत सरसकट कुणबी प्रमाणपत्र, अंतरवाली सराटीत दाखल गुन्हे मागे घेणे आणि अटक केलेल्या मराठा समाजातील युवकांना सोडून देण्याच्या मागण्या मान्य कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...तर भाजपचा कार्यक्रम होईलउपमुख्यमंत्री फडणवीस हे भुजबळांना बळ देत असल्याचा संशय आहे. त्यांनी असे करून मराठा समाजावर अन्याय करू नये, अशी विनंती आहे. मात्र, हे थांबले नाहीत तर भाजपचा नक्कीच ‘करेक्ट’ कार्यक्रम होईल, असा इशाराही त्यांनी दिली. पहिल्यासारखा आता मराठा राहिलेला नाही. मराठा समाज एकवटला आहे. त्यात आता कोणीही फूट पाडू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

१७ डिसेंबर रोजी आंदोलनाची दिशा ठरणारमराठा आरक्षणासाठीच्या आगामी लढ्याची दिशा १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत ठरणार आहे. ही बैठक सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यात समाजाच्या सर्व क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद