शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर प्रशासन निवडणुकीत; औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 15:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना लागणारा निधी गोठवून तो कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळविण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींच्या निधीतील कामांना सध्या ब्रेक असणार आहे.जी कामे सुरू झालेली आहेत. ती कामे सुरुच राहतील.

औरंगाबाद : जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. १५ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार असल्यामुळे १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. कोरोनातून सावरत नाहीत तोवर यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. परिणामी जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे.

लोकप्रतिनिधींच्यानिधीतील कामांना सध्या ब्रेक असणार आहे. तसेच जी कामे मंजूर झाली आहेत, त्यांचेही उद्घाटन आचारसंहितेच्या काळात होणार नाही. जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्तावित कामे सध्या सुरू होणार नाहीत. त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच जिल्हा परिषद पातळीवर असलेली नवीन कामे देखील सुरू होणार नाहीत. पंचायत समित्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना लागणारा निधी गोठवून तो कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळविण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांसह पाणीपुरवठा योजनेची व नावीन्यपूर्ण योजनांची कामे ठप्प पडली आहेत.  लॉकडाऊनमध्ये हळूहळू सवलत दिल्यानंतर जी कामे मंजूर होती, ती पुन्हा सुरू झाली. ज्या कामांची गरज होती, त्यांचे अंदाजपत्रक तयार झाले, मात्र पदवीधर निवडणुकीमुळे ती कामे थांबली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना १८ जानेवारीपर्यंत मुहूर्त लागणार नाही.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी...जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, पदवीधरच्या निवडणुकीत एक महिना गेला. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन विकासकामांना ब्रेक लागणार आहे. नवीन कामे होणार नाहीत; परंतु जी कामे सुरू झालेली आहेत. ती कामे सुरुच राहतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादfundsनिधी