शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टोल वसुली बुथवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी धोरण निश्चित करा; खंडपीठाचे राज्यशासनास आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:02 IST

धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिवांकडून मागविले स्पष्टीकरण

ठळक मुद्देकंत्राटदाराला लेन बंद करण्याचा अधिकार नाहीमहामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कोणाची?

औरंगाबाद : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे वरील टोल वसुली बुथवर (टोल प्लाझा) वाहतूक कोंडी आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शासनाने धोरण निश्चित करावे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीची यंत्रणा कशाप्रकारे काम करील याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांनी तीन आठवड्यांत शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. झेड.ए. हक आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी गुरुवारी (दि. २७) राज्य शासनाला दिला. 

टोल प्लाझावरील उपलब्ध असलेले काही मार्ग बंद ठेवण्याचा कंत्राटदाराला अधिकार आहे काय, ते सर्व मार्ग चालू का ठेवत नाहीत, याबाबत खंडपीठाने  मंगळवारी (दि २५) शासनाकडून खुलासा मागविला होता. गुरुवारी शासनाने शपथपत्र दाखल करून कंत्राटदाराला तसा अधिकार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. काही मार्ग बंद ठेवण्याची कंत्राटदाराची कृती बेकायदेशीर आणि महामार्गाला अडथळा आणि प्रतिबंध करणारी आहे. कंत्राटदाराने अशा प्रकारे मार्ग बंद केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सा.बां. विभागाची जबाबदारी आहे. या खात्यामार्फत टोलनाक्यावर लक्ष ठेवण्याची आणि कसूरदारावर कारवाई करण्याची हमी शपथपत्राद्वारे सा.बां. विभागांतर्गतच्या जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरसिंग विश्वंभर भांडे यांनी खंडपीठास दिली.  याचिकाकर्ते सतीश तळेकर यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर आणि अजिंक्य काळे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील अतुल काळे यांनी काम पाहिले.

कंत्राटदाराला लेन बंद करण्याचा अधिकार नाहीटोल बुथवरील उपलब्ध असलेला एकही मार्ग (लेन) बंद ठेवण्याच्या कंत्राटदाराला अधिकार नसल्याचे शासनाने पोलिसांसह सर्व खात्यांना कळवावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.  कायदा, नियम, परिपत्रक किंवा वैयक्तिक कराराद्वारे कोणताही टोल प्लाझा कंत्राटदार अथवा व्यवस्थापकाला  टोल बुथवरील  उपलब्ध असलेला एकही मार्ग (लेन) बंद ठेवण्याची परवानगी दिली नसल्याचे शासनाने शपथपत्रात स्पष्टीकरण दिले आहे. 

महामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कोणाची?बंद झालेल्या टोल प्लाझावरील बांधकामे आणि अपघात अथवा अन्य कारणाने महामार्गावर बंद पडलेली वाहने हटविण्याची जबाबदारी कंत्राटदाराची की राज्य शासनाची या दोन मुद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी मुदत देण्याची विनंती शासनाने शपथपत्रात केली. त्यामुळे या जनहित याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकार