शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:44 IST

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पाच मोठ्या घटना घडल्या आहेत.

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पाच मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे दिसून येते.  यासोबतच आठ दिवसांपूर्वी पत्नीचा खून करून पसार झालेला आणि अन्य एका खुनाच्या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पदमपुरा येथील नवयुग कॉलनीत राहणारे कापड दुकानदार रमण रांदड यांचे घर भरदिवसा चोरट्यांनी फोडले. या घटनेत १४ तोळ्याचे दागिने आणि १ लाख २० हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली. ही घटना ३० जून रोजी घडली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद आहे, तर अशाच दुसऱ्या घटनेत १ सप्टेंबर रोजी हमालवाडा येथील अमृतसाई अपार्टमेंटमधील रो हाऊस फोडून चोरट्यांनी २२ तोळ्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली.  दोन्ही घटनांपूर्वी पदमपुरा येथील एका प्राध्यापकाचे घर फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला होता. 

पहाडसिंगपुरा येथील एका निवृत्त नर्सचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने लंपास केले होते. या घटनांचा अद्याप उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले नाही. असे असताना बन्सीलालनगर येथील महेश अग्रवाल यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर चार दिवसांनी उल्कानगरी येथील मनीष वाखारकर यांचे बंद घर भरदिवसा चोरट्यांनी फोडले. वाखारकर यांच्या घरातून चोरट्यांनी साडेसात तोळ्याचे दागिने चोरून नेले. या घटनेप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

बन्सीलालनगरात चोरटे आले कारमधूनबन्सीलालनगर येथील अग्रवाल यांचे घर फोडण्यासाठी चोरटे कारने आले होते, अशी माहिती समोर आली. यावरून चोरटे हायटेक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षी गुन्हे शाखेने पकडलेली खिडकी गँगही चोऱ्या करण्यासाठी कारचा वापर करीत होती.

पत्नीचा मारेकरी सापडेनाचारित्र्याच्या संशयावरून परिचारिका पत्नीचा भोसकून खून केल्यानंतर पसार झालेल्या भाऊसाहेब शिंदेचा अद्याप पोलिसांना शोध लागला नाही. पत्नीचा खून केल्यानंतर तो मोपेडवर बसून पळून गेला होता. तो अथवा त्याची मोपेड मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली नाही. हायवाचालक तरुणाचा खून केल्यानंतर पसार झालेला नील पाटील आणि त्याचे साथीदारही पोलिसांना नऊ दिवसांपासून चकमा देत आहेत, या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादtheftचोरी