शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
3
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
4
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
7
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
8
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
9
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
10
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
11
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
12
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
13
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
14
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
15
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
17
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
19
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
20
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!

By साहेबराव हिवराळे | Updated: April 22, 2023 19:48 IST

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार!

छत्रपती संभाजीनगर : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार तसेच त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. पाठ्यपुस्तके तसेच देश व परदेशातील शैक्षणिक शिष्यवृत्तीही त्याचाच भाग आहे. त्यासाठी पात्र पाल्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी जवळपास साडेपाच हजार अर्ज भरून घेण्यात आले. खबरदारी घेतली, तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग झाले आहेत. आता कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी ‘खाते’ सोशल मीडियाच्या मदतीने शोध घेत आहेत.

साडेपाच हजारपैकी २०० नॉट रिचेबल...कामगार कल्याण मंडळात अर्ज दाखल करताना विद्यार्थी तसेच पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज हे खासगी सेवा केंद्रामार्फत मंडळाला दाखल केले आहेत. त्यांनी त्या अर्जांची पडताळणी करून ते पुढे पाठविल्याचे सांगितले असले तरी विद्यार्थ्याच्या खात्यात अद्याप काहीही जमा झालेले नाही. ज्यांच्याकडे मोबाइलच नाही, त्यांचे स्वत:चे किंवा वडिलांचे जनधन खाते असेल काय, याचा शोध अधिकारी घेत आहेत.

कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्ती अर्जात त्रुटी...शैक्षणिक सत्र संपत आले असून, छत्रपती संभाजीनगर विभागात अनेक त्रुटी आढळून आल्या. अजून किती दिवस प्रतीक्षा करावी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. यंदा पडताळणी करून अर्ज स्वीकारले आहेत, मग कामगार पाल्यांपैकी दोनशे पाल्य अद्याप शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उच्च शिक्षितांच्या खात्यातही शिष्यवृत्ती...मंडळाने यंदा अत्यंत गतिमान काम केलेले आहे. पाठ्यपुस्तक व इतर साहित्य देण्यात आले असून, शिष्यवृत्तीचा निधीही बँक खात्यात टाकण्यात आला. परंतु, ज्या दोनशे कामगार पाल्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यांनी त्यांच्या खाते नंबरसह नजीकच्या कामगार मंडळ किंवा ललित कला भवनात वरिष्ठांशी संपर्क साधावा. पात्र ठरलेल्या पाल्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती पाठविणार आहोत.-मनोज पाटील, सहायक कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण