शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आजारी पडले तरी, आता ‘नो टेन्शन’, मिनी घाटीत २४ तास डाॅक्टर कामावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 18:45 IST

प्रत्येक डाॅक्टर ‘ऑन काॅल’, अत्यावश्यकप्रसंगी रुग्णालयात धाव

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : उन्हाळा म्हटला की, सुट्या आणि कुटुंबासह पर्यटन, देवदर्शन, मुलांचा मामाच्या गावाला दौरा असेच समीकरण पाहायला मिळते. प्रत्येकजण किमान काही दिवस सुट्या घेतात. परंतु काहीजण असे आहेत की, ते २४ तास कर्तव्यावर असतात, ते म्हणजे डाॅक्टर. मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील केवळ २ डाॅक्टरांनी मे महिन्यात सुटी घेतली आहे. त्यामुळे आजारी पडले तरी ‘डाॅक्टर नाहीत, ते सुटीवर आहेत’ असे कोणीही म्हणणार नाहीत.

घाटीपाठोपाठ चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. याठिकाणी रोजची ओपीडी आता दीड हजारांवर गेली आहे. त्याबरोबर प्रसूतींची संख्या वाढत आहे. अनेक गुंतागुंतीचे उपचार येथील डाॅक्टरांनी यशस्वीरित्या दिले आहेत. त्यामुळे रुग्णालयावर डाॅक्टरांचा विश्वास वाढत आहे.

आकडेवारी काय सांगते ?जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर-४३इतर स्टाफ- १७३

सुटीसाठी करावा लागतो अर्जजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सुटीसाठी अर्ज करावा लागतो. आजघडीला २ डाॅक्टरांनी मे महिन्यात अर्जित रजा घेतली आहे. २९ दिवसांसाठी ते सुटीवर आहेत. परंतु गरज पडली, तर त्यांना रुग्णसेवेसाठी बोलावले जाईल. इतर कर्मचारी एक ते दोन दिवसांसाठी सुटी घेण्यासाठी अर्ज करतात.

कामावरील डाॅक्टर २४ तास दक्षजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांना २४ रुग्णांसाठी दक्ष राहावे लागते. कामाचे ८ ते १२ तास झाले आणि काम संपले, असे डाॅक्टरांच्याबाबतीत होत नाही. डाॅक्टर हे ऑन काॅल असतात. ओपीडीनंतर सर्जरी, प्रसूती आदींसाठी त्यांना कधीही रुग्णालयात परत यावे लागते.

जिल्हा रुग्णालयात या होतात शस्त्रक्रियाजिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कानाच्या काही मायनर आणि मेजर शस्त्रक्रिया, हाड मोडणे, पायातील राॅड काढण्याच्या शस्त्रक्रियेसह इतर अनेक शस्त्रक्रिया होतात. डाॅक्टर सुटीवर असले, तरी शस्त्रक्रियांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले.

रुग्णसेवेसाठी तत्परजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांवर कोणत्याहीप्रकारे कामाचा ताण नाही. मे महिन्यात केवळ २ डाॅक्टर सुटीवर आहेत. ज्या दिवशी रुग्णालयातील संपूर्ण खाटा भरलेल्या असतील, तेव्हा ताण येईल. डाॅक्टरांना रुग्णांसाठी कधीही रुग्णालयात यावे लागते.- डाॅ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर