शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 13:27 IST

CM Uddhav Thackeray : कोर्ट रिकामी रहावीत, अशा समाज सुधारणेचे मोठे आव्हान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वांनी स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  

औरंगाबाद : गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. समाजातील गुन्हेगारी नष्ट होऊन कोर्ट रिकामे व्हावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज व्यक्त केली. तसेच एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचा अधिकारी वेगळा आहे, स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या विधी तज्ञांनी करावी असे मत यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. ते औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

ठाकरे पुढे म्हणाले, महिलांवरी अत्याचार देशात मोठ्या प्रमाणावर, असहाय्य, बेघर महिलां अत्याचाराला बळी पडत आहेत. गुन्हा घडल्यास लवकर न्याय मिळाला, मात्र, आपल्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट  झाली पाहिजे. गुन्हाच झाला नाही पाहिजे अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात यावर आपण प्राधान्याने काम करावे.

राज्य सुद्धा सार्वभौम, केंद्राप्रमाणेच अधिकारअधिकाराच्या बाबतीत राज्याच्यावर केंद्र सरकार आहे का ? राज्याचा अधिकार कुठे आहेत ? यावर माहिती घेतली असता, एक मोजके अधिकार सोडले ते केंद्रा ऐवढेच राज्य सार्वभौम आहेत, केंद्रा एवढीच राज्यांना ताकद आहे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्याचे पुढे आले. मात्र राज्यांना ते अधिकारी आहेत का यावर विचार व्हावा. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्व जेष्ठ विधी तज्ञांनी स्वातंत्र्य म्हणजे काय याची नेमकी व्याख्या करावी. एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचे अधिकार वेगळे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे मत व्यक्त केले. तसेच घटनेच्या चौकटीचे सर्वांनी पालन केले तरी समाज गुन्हे मुक्त होईल,असे कार्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले . 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे