शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण दिंडीचे पैठण येथून प्रस्थान; छत्रपती संभाजीनगरात उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 18:10 IST

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या  मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार

पैठण: मराठा समाजास सरसकट  आरक्षण द्यावे या मागणीसाठी  पैठण ते छत्रपती संभाजीनगर पायी आरक्षण दिंडीचे शुक्रवारी सकाळी ११ वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रस्थान झाले. हजारो समाज बांधव या दिंडीत सहभागी झाले होते. आरक्षण दिंडी शुक्रवारी बिडकीन येथे मुक्कामी थांबणार आहे. 

दरम्यान, पैठण ते बिडकीन दरम्यान विविध गावातील ग्रामस्थ या दिंडीत सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या  मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन शनिवारी (दि. १६) रोजी देऊन पायी आरक्षण दिंडी परत फिरणार  आहे. शुक्रवारी सकाळी पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून मराठा मोर्चाच्यावतीने आरक्षण दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

अंतरवाली सराटी येथील लाठिचार्जचा निषेध व मराठा आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून पैठण येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून पैठण ते छत्रपती संभाजी नगर आरक्षण दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आरक्षण दिंडीचे ठिकठिकाणी फटाके वाजवून गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डोक्यावर मराठा आरक्षण असे लिहलेल्या टोप्या व हातात भगवा ध्वज घेऊन मराठा समाजातील युवक आरक्षण दिंडीत सहभागी झाले. 

आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजास सरसकट आरक्षण द्या अशा घोषणा युवक देत होते.  पैठण ते छत्रपती संभाजी नगर रस्त्याचे  व जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.  रिमझिम पाऊस झाल्याने रस्ता निसरडा झाला होता. आरक्षण दिंडीला यामुळे मार्गात अनेक अडथळे पार करावे लागले. आरक्षण दिंडीतील स्वयंसेवकांनी दिडीमुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही याची काळजी घेतली.  शुक्रवारी  बिडकीन येथे आरक्षण दिंडीच्या भोजनाची व्यवस्था बिडकीन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळी दिंडी छत्रपती संभाजीनगर कडे रवाना होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण