शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अखेर आरोग्य यंत्रणा हलली, कोरोनाबरोबरच डेंग्यू रोखण्यासाठी लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 13:19 IST

dengue increased in Aurangabad : शहरात २०१९ मध्ये डेंग्यूचा उद्रेक रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला होता. आता पुन्हा एकदा त्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनियंत्रण कक्ष सुरूकृती आराखडा होतोय तयारप्रत्येक रक्तपेढीत रोज ३० ते ४० प्लेटलेट पिशव्यांची मागणी

औरंगाबाद : डेंग्यूचा कहर वाढल्याने शहरात प्लेटलेटची मागणी वाढली आहे. प्रत्येक रक्तपेढीत रोज ३० ते ४० प्लेटलेट पिशव्यांची मागणी होत आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणा अखेर हलली. सार्वजनिक आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सुरू केला असून, कोरोनाच्या पाठोपाठ आता डेंग्यूला रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. महापालिका प्रत्येक झोनमध्ये मोहीम राबवित आहे. 

शहरात २०१९ मध्ये डेंग्यूचा उद्रेक रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला होता. आता पुन्हा एकदा त्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ.मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, साधारण व्यक्तीमध्ये प्लेटलेटचे प्रमाण (काउंट) हे १.५ ते ५.५ लाख असतात. प्लेटलेट २० हजारांपेक्षा खाली येणे ही धोक्याची पातळी असते, तर १० हजारांखाली गेल्यानंतर रुग्णाला प्लेटलेट द्यावे लागतात. घाटीत प्लेटलेट कमी झालेले रुग्ण दाखल होत आहेत.

तत्काळ कार्यवाहीडेंग्यू रोखण्यासाठी नवीन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर, २०१९ मध्ये तयार केलेल्या आराखड्याची माहिती घेतली जाईल. तो आराखडा चांगला असेल, तर तोही राबविला जाईल. नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, कुठेही रुग्ण वाढले, तर तत्काळ कार्यवाही केली जाईल.- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी.

प्रत्येक झोनमध्ये मोहीमडेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून एका दिवशी एका झोनमध्ये १०० ते १२५ कर्मचारी डेंग्यू नियंत्रण मोहीम राबवित आहेत. आतापर्यंत ५ झोन पूर्ण झाले आहेत. ॲबेटिंग, धूर फवारणी केली जात असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.- डाॅ.पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

रोज ४० पिशव्या प्लेटलेटसाधारण रोज ४० रँडम डोनर प्लेटलेटच्या पिशव्या लागत आहेत, तर २ ते ३ सिंगल डोनर प्लेटलेटची मागणी आहे. प्लेटलेटची मागणी पाहता, अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे.- डाॅ.मंजुषा कुलकर्णी, दत्ताजी भाले रक्तपेढी.

प्लेटलेटची एकच बॅगसोमवारी ३४ प्लेटलेट बॅग देण्यात आल्या. सध्या प्लेटलेटची एकच बॅग शिल्लक आहे. रक्तपेढीत पुढील ५ ते ६ दिवस पुरेल, इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.- हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका